Premium|AI Development Risks : एआयचा वेग कमी करण्याची वेळ आली? निर्मात्यांचाच इशारा

AI Safety Concerns : एआय क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच निर्मातेच तंत्रज्ञानाचा वेग कमी करण्याची भूमिका मांडत आहेत. डॅरिओ ॲमोडेई यांच्या इशाऱ्याला सॅम ऑल्टमॅन, इलॉन मस्क आणि डेमीस हॅसबिस यांनी समर्थन दिले.
AI Development Risks

AI Development Risks

esakal

Updated on

सी. ई. पोतनीस

कृत्रिम बुद्धिमत्तेचा सध्या खूप बोलबाला आहे. परंतु गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निर्मात्यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. निमार्त्यांनी दिलेल्या धोक्याच्या इशाऱ्याकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता निर्माण झालेली आहे.

गेली काही वर्षे आपण कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील कंपन्यांची चढाओढ पाहत आहोत. ओपन एआय, ॲन्थ्रोपिक, गुगल डीपमाइंड आणि इलॉन मस्क यांच्या एक्स-एआय या सगळ्यांचीच धडपड आपले मॉडेल अधिक प्रभावी, अधिक सक्षम आणि अधिक सुरक्षित बनवण्याची आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच जे घडले, ते थोडे अनपेक्षित होते.

ॲन्थ्रोपिकचे प्रमुख डॅरिओ ॲमोडेई यांनी ‘वी मस्ट पेस द फ्रंटिअर’ हा दीर्घ लेख प्रसिद्ध केला. त्यांचा मुद्दा असा होता की, ‘एआय’ची क्षमता वाढवण्याचा वेग आपण जाणीवपूर्वक कमी केला पाहिजे. काही तासांतच ‘ओपन एआय’चे सॅम अल्टमॅन यांनीही त्याला दुजोरा दिला. इलॉन मस्क यांनी तर फक्त तीन शब्दांत प्रतिक्रिया दिली, ‘डॅरिओ इज राइट.’ ‘गूगल डीपमाइंड’चे डेमीस हॅसरबीस यांनीही समर्थन केले. जे लोक वर्षानुवर्षे परस्पर स्पर्धेत आहेत, ते अचानक एकाच सुरात बोलू लागले, ही बाब लक्षात घेण्यासारखी आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com