
ऋषिराज तायडे - rushirajtayde@gmail.com
पाच ते ३० मिनिटांचा अवधी अन्....तुम्हाला हवी असलेली संशोधनात्मक माहिती ‘डीप रिसर्च’कडून किती वेळात उपलब्ध होईल, हे त्याविषयाची सखोलता आणि तुम्ही विचारलेल्या मुद्द्यांवर अवलंबून आहे. सध्या ‘डीप रिसर्च’ला संशोधनासाठी सरासरी पाच ते ३० मिनिटांचा कालावधी लागत असल्याचा दावा ‘ओपन एआय’ने केला आहे. आपल्याला एखादे किचकट गणित सोडविण्यासाठी अधिक वेळ लागतो, त्याप्रमाणेच ‘डीप रिसर्च’लाही विषयाच्या काठिण्यपातळीनुसार कमी-जास्त वेळ लागत असल्याचे ‘ओपन एआय’चे म्हणणे आहे.