अफगाणिस्तानातून अमेरिकेनं फौजा मागं घेतल्या आणि ज्या तालिबानी गटांच्या विरोधात युद्ध सुरू झालं, त्यांच्याच हाती देश पडला. तेव्हा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री तालिबानच्या यशानं या भागात एक नवं समीकरण साकारतं आहे ज्याला जागतिक महत्त्व असेल, असं अत्यानंदानं सांगत होते, तेव्हाचे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अफगाणिस्तानात गुलामीच्या साखळ्यांतून मुक्त झाल्याचं सांगत होते.