

New Era Publication Pune books
esakall
अनस्क्रिप्टेड
आपले आयुष्य अनाकलनीय आहे. त्यामुळेच ते खऱ्या अर्थाने ‘अनस्क्रिप्टेड’ असते. आयुष्यातील छोट्या-छोट्या प्रसंगातून काही तरी चांगले गवसणे म्हणजे काय याचा शोध ‘अनस्क्रिप्टेड’ या पुस्तकाद्वारे लेखक अमोल देशमुख यांनी घेतला आहे. जीवनात विविध ठिकाणी, प्रसंगी भेट झालेल्या व्यक्तींचे चित्रण, निरीक्षणे या पुस्तकात त्यांनी मांडली आहेत. ती वाचताना आपणही त्याच्याशी नकळतपणे जोडले जातो. कधी अचानकपणे एखाद्या प्रसंगाची आठवण येते, कधी चर्चेतून एखादी भावना निर्माण होते अशा प्रसंगाचे, व्यक्तींचे वर्णन या पुस्तकात करण्यात आले आहे. मनात त्या-त्या वेळी निर्माण झालेले भाव शब्दबद्ध करण्यात आले असल्याने वाचकांना ते प्रसंग आपले वाटतात.
वैशिष्ट्य : ओघवत्या शैलीत केलेले व्यक्तिचित्रण व घटनांचा घेतलेला अचूक वेध. प्रकाशक : न्यू ईरा पब्लिकेशन, पुणे पृष्ठे : २४८, मूल्य : ३५० रु.