भूमीचे प्रश्‍न विचारणारी कला

कलाकार विभा गल्होत्रा यांनी दिल्ली ते मंगोलिया, यमुना ते हिमालय असा प्रवास केला.
An Art That Raises Questions About the Land

An Art That Raises Questions About the Land

sakal

Updated on: 

- हर्ष भटकळ, saptrang@esakal.com

कलाकार विभा गल्होत्रा यांनी दिल्ली ते मंगोलिया, यमुना ते हिमालय असा प्रवास केला. वातावरणाचा वेध घेण्यापासून ते ‘लँड आर्ट’ आणि स्थानिक निसर्गचित्रांपासून संपूर्ण विश्‍वाला भेडसावणाऱ्या प्रश्‍नांकडे त्या वळल्या.

ही नदी नव्हे, तर एक नालाच आहे असे मी समजत होते...’ म्हटले तर हे एक अत्यंत साधेसुधे वाक्य. परंतु विभा गल्होत्रा यांच्या कलाप्रवासाचे मर्म इतर कोणत्याही विधानातून स्पष्ट होणार नाही. विभा यांना यमुना नदीचा परिचय बालपणापासून होता. त्या २००९मध्ये कलाकाराच्या नजरेतून यमुनेकडे पाहू लागल्या, तेव्हा त्यांना दिसला शहराच्या कचऱ्यामुळे दूषित झालेला पाण्याचा प्रवाह. त्या पाण्यात गटारे सोडली जात होती. लोक तिथे पूर्वजांसाठीचे संस्कार करायचे. त्या पाण्याला पवित्र समजून त्यात डुंबायचे. विभा यांना काळजी वाटली. त्यांनी एकाला ‘त्या दूषित पाण्यात जाऊ नको,’ म्हणून थांबवायचा प्रयत्न केला. ती व्यक्ती म्हणाली, ते विभा विसरू शकल्या नाहीत. ते म्हणाले होते, ‘‘माझ्या या आईला घाणेरडी म्हणण्याची हिंमत कशी झाली तुम्हाला?’’ या वादावादीमुळे अंधश्रद्धा आणि वातावरणातील वास्तव यांतील विरोधाभास त्यांना जाणवला. तोच त्यांच्या कलेला वेगळे वळण देऊन गेला.

Loading content, please wait...