

Ancient Indian Scientific Knowledge
esakal
आशिष तागडे - ashish.tagade@esakal.com
आपल्या देशाला समृद्ध आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरेबरोबर वैज्ञानिक परंपराही लाभली आहे. आधुनिक जगातील बहुतांश शोधाची जननी आपली वैदिक परंपरा आहे. आपल्या ऋषिमुनींकडे अध्यात्माबरोबर प्रगत वैज्ञानिक ज्ञानही होते. त्याचे दाखलेही आहेत.
‘विश्वाची निर्मिती कशी झाली? पदार्थाचे स्वरूप काय आहे? सृष्टीतील घटक एकमेकांशी कसे संबंधित आहेत?’ हे प्रश्न आजच्या आधुनिक भौतिकशास्त्रासमोर जितके महत्त्वाचे आहेत, तितकेच ते हजारो वर्षांपूर्वीच्या भारतीय परंपरेलाही कुतूहलाचे वाटत होते. वैदिक काळापासून या प्रश्नांची उत्तरे शोधताना आधुनिक विज्ञानाने प्रयोग, निरीक्षण आणि तर्क यांच्या आधारे मोठी प्रगती केली. परंतु, या शोधयात्रेत प्राचीन ऋषीपरंपरेने स्वतंत्र चिंतनपद्धतीने महत्त्वपूर्ण योगदान दिले होते, हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. हे लक्षात आणून देण्याचे काम डॉ. मनीषा पुराणिक यांनी केले आहे. भारतीय ज्ञानपरंपरेत दडलेले हे वैज्ञानिक चिंतन उलगडून दाखवणारा महत्त्वपूर्ण दस्तावेज म्हणजे ‘प्राचीन भारतीय भौतिकशास्त्र’ हे पुस्तक! भौतिकशास्त्राला प्राचीन भारतीय इतिहास आणि संस्कृती त्याचबरोबर भारतीय विज्ञानाची जोड देत डॉ. पुराणिक यांनी मांडणी केली आहे.