

Indian textile art
esakal
वस्त्र विणण्याची कला आपल्याकडे प्राचीन काळापासून आहे. ती केवळ कला नव्हती तर विद्याशाखांमध्ये तिला स्थान होते. भारतात वस्त्रकला ही फक्त एक उपयुक्त कला नसून एक समृद्ध ज्ञानप्रणाली होती. त्याचबरोबर कापसाची निर्यात आपल्याकडून मोठ्या प्रमाणात होती.
‘एक धागा सुखाचा, शंभर धागे दुःखाचे, जरतारी हे वस्त्र माणसा, तुझिया आयुष्याचे’. सुधीर फडके यांच्या आवाजातल्या ग. दि. माडगूळकर यांच्या लेखणीतून उतरलेल्या ह्या अवीट गोडीच्या ओळी आपण सर्वांनीच कधी ना कधीतरी ऐकल्या आहेत. हे गाणे मला फार आवडते कारण ह्यामध्ये गदिमांनी फार सहजपणे दाखवलेलं आहे की सुख आणि दुःख ह्या दोन्ही भावना एकमेकात गुंफूनच मानवी जीवन घडतं, आणि त्यात सुखाचा वाटा कमी आणि दुःखाचा वाटा जास्त असला तरी हे वस्त्र जरतारी आहे, हवेहवेसे वाटणारे आहे.