अगं तू एकदा त्याच्या मनात तर शिर...

अभिनव ब. बसवर
शनिवार, 14 सप्टेंबर 2019

त्याला फार पटकन राग येतो. चिडला की मग वेडंवाकडं बोलून जातो. थोड्यावेळाने शांत झाला की सॉरी म्हणतो. मध्ये तर माझ्या मित्राचा मला दोन तीन वेळा कॉल आला म्हणून चिडला. नेहमीचंच झालंय. हल्ली सतत सिरियस असतो. बिंधास्तपणे वागत नाही. मलाही सारखं बालीशपणे वागणं बंद कर म्हणतो. काय लहान मुलासारख़ं प्रत्येक गोष्टीत हट्ट करते म्हणून चिड़तो.

त्याला फार पटकन राग येतो. चिडला की मग वेडंवाकडं बोलून जातो. थोड्यावेळाने शांत झाला की सॉरी म्हणतो. मध्ये तर माझ्या मित्राचा मला दोन तीन वेळा कॉल आला म्हणून चिडला. नेहमीचंच झालंय. हल्ली सतत सिरियस असतो. बिंधास्तपणे वागत नाही. मलाही सारखं बालीशपणे वागणं बंद कर म्हणतो. काय लहान मुलासारख़ं प्रत्येक गोष्टीत हट्ट करते म्हणून चिड़तो.

ती नाराज होऊन होस्टेलमधील तिच्या सिनिअर मैत्रिणीला मनातलं सगळं काही सांगत होती. तिचं ऐकून घेतल्यानंतर मैत्रीण म्हणाली, "चार वर्षे झाली तुमच्या नात्याला. सुरुवातीची रोमांटिक फेज पार करुन तो पुढे गेला पण तू मात्र तिथेच अडकली, मागे पडली. तो तुला त्या फेज मधून बाहेर काढून स्वतःसोबत घेऊन जाण्यासाठी ओढतोय पण तू त्या जुन्या आठवणीतच रमली. तुला पुन्हा पुन्हा ते क्षण जगू वाटतात. तिच नवलाई पुन्हा अनुभवावी वाटते.

कॉलेजमध्ये एखाद्या मित्राने तुला इम्प्रेस करण्यासाठी तुझ्या मागे पुढे केलं, कौतुक केलं, तुझ्यासोबत मस्त वेळ घालवला, गप्पा मारल्या, तुझं सगळं ऐकून घेतलं की तू या सगळ्याची तुलना प्रियकराशी करते. त्याच मित्राचा दिवसातून अनेकदा फोन येतो, तूला उचलावासा वाटतो आणि तुझी इन्वहॉलमेंट बघून प्रियकर चिड़तो. शेवटी प्रियकर आहे तो, प्रेयसीभोवती कोणी घुटमळत असेल तर इनसिक्यूर होणारच ना. त्याचा देखील पहिलाच अनुभव, या गोष्टीमध्ये तरबेज असता तर कशाला झाली असती त्याची चिड़चिड़. हळू हळू अनुभवातूनच तो शांत संयमी होत जाणार.

तुला त्याला सांभाळून घ्यायला हवं. चारचौघात तू चुकली तर तो तुला सांभाळून घेत आला ना. नेहमी तुझ्या बाजूने उभा राहिला. थोडं रोमांटिक फेज मधून बाहेर पडून नात्याकड़े बघ. आपल्या माणसाला जप. तो चिड़तोय तर का चिड़तोय समजून घे, कुठे त्रास होतोय जाणून घे. तो कधीच तुला भावना बोलून दाखवणार नाही पण एकदा तू त्याच्या मनात तर शिर, मग बघ कसा तुझ्या कुशीत शिरून मोकळा होईल.

तिला पटलं. जाणीव झाली. जुने दिवस आठवले. पाणावलेले डोळे तिने पुसले आणि मैत्रिणीला मिठी मारली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Artcile phase of a relationship by Abhinav Basawar