esakal | मांजरांशी खेळणं, चित्रं आणि गायन
sakal

बोलून बातमी शोधा

Jui-Gadkari

मला पेंटिंग्ज करायची खूप आवड आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी मी माझ्यातला हा गुण, ही कला बहरायला वेळ देते. त्यासोबतच मला बागकाम करायलाही खूप आवडतं. माझ्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत.

मांजरांशी खेळणं, चित्रं आणि गायन

sakal_logo
By
जुई गडकरी

मी   वीकएण्डच्या दिवशी जास्तीत जास्त वेळ घरीच घालवते. माझ्या घरी लहान-मोठ्या अशा एकूण आठ पर्शियन मांजरी आहेत. त्यामुळे माझा संपूर्ण वेळ हा त्यांचं ब्रशिंग करण्यात, त्यांचं संगोपन करण्यात जातो. घरी असल्यावर त्यांना अंघोळ घालणं, त्यांना काय हवं नको ते बघणं, याकडे मी लक्ष देते. नित्यनियमानं मी काही वेळ योगा करते. त्यासोबत घरातलं बाकी सगळं आवरणं चालूच असतं. माझे खूप छंद आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मला पेंटिंग्ज करायची खूप आवड आहे. त्यामुळे सुटीच्या दिवशी मी माझ्यातला हा गुण, ही कला बहरायला वेळ देते. त्यासोबतच मला बागकाम करायलाही खूप आवडतं. माझ्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची झाडं आहेत. मग घरी असल्यावर त्यांची छान निगा राखण्याला मी माझा काही वेळ देते. मी गाणंही शिकले आहे. त्यामुळे सुटी असल्यावर की-बोर्ड काढून गाण्याचा रियाज कारणं, वेगवेगळी गाणी गाणं माझं सुरू असतं. मी मूळची कर्जतची, कामानिमित्त मी माझ्या घरच्यांपासून लांब राहते. तसं असल्यामुळे आपला आपला स्वयंपाक बनवणं हे आलंच! जो मी आनंदानं करते. सतत वेगळे पदार्थ बनवणं आणि ते आवडीनं खाणं हे मी नेहमीच खूप एन्जॉय करते. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कधी लागून सुटी आली, तर मी आमच्या घरी कर्जतला जाते. तिथं आमची जॉइंट फॅमिली आहे. आम्ही सगळे भाऊ-बहिणी, घरातली मोठी मंडळी मिळून प्रचंड मज्जा करतो. अमच्या घरी गच्चीतही टीव्ही आहे, तिथंही आमची धम्माल सुरू असते. मी घरी गेल्यावर सगळे एकत्र मिळून स्वयंपाक करणं, एकत्र चित्रपट बघणं, गेम्स वगैरे खेळणं आणि भरपूर गप्पा मारणं, हे सगळं आमचं ठरलेलं असतं. माझे मित्र-मैत्रिणी हे जास्त करून कर्जतचेच आहेत. मग मी कर्जतला अमच्या घरी गेले, की आवर्जून आम्ही सगळे भेटतो. तिथंही अमचे गप्पांचे फड रंगतात, जुन्या आठवणी निघतात, अनेक नवीन गोष्टी कळतात. या सगळ्यांना भेटून असा छान वीकएण्ड गेल्यावर पुन्हा एकदा कामाला सुरुवात करायला कोण रिफ्रेश नसणार! 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

(शब्दांकन : राजसी वैद्य)