चिखल्या आणि बुरशीजन्य त्वचारोग

Dermatology
Dermatology

आरोग्यमंत्र - डॉ. धनश्री भिडे, त्वचारोगतज्ज्ञ 
बुरशीमुळे शरीराच्या विविध भागांवर गोलाकार चट्टे उमटणे, बोटांच्या फटींमध्ये चिखल्या होणे, सुरमा अशा प्रकारची लक्षणे सर्वसाधारणपणे आढळून येतात. बुरशीमुळे होणारा जंतुसंसर्ग त्वचेबरोबरच नखांना अथवा केसांनासुद्धा होऊ शकतो. सामान्यपणे योग्य उपचार घेतले व त्वचेची आणि कपड्यांची स्वच्छता राखल्यास ही लक्षणे आटोक्‍यात ठेवता येतात. परंतु, सध्या या आजाराचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असून, संसर्गामुळे घरातील अनेक लोकांमध्ये हे जंतू पसरलेले आढळून येत आहेत. ज्या व्यक्तींमध्ये ही लक्षणे आढळून येतात, अशा व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी गेल्या (उदा. पोहण्याचा तलाव, पार्लर, केशकर्तनालय) तर इतरांमध्ये या आजाराचा फैलाव होण्याची शक्‍यता असते. या व्यक्तींचे कपडे इस्त्रीच्या दुकानात इतरांबरोबर मिसळले गेले, तरीसुद्धा जंतुसंसर्ग होऊ शकतो. 

कोणताही जंतुसंसर्ग झाला की, सर्वप्रथम औषधाच्या दुकानात जाऊन मिळेल ते मलम आणून वापरले जाते. बरेच वेळा अज्ञानामुळे स्टेरॉईड मिश्रित मलमे लावली जातात. काही मलमांमध्ये अजून ३ ते ४ औषधांचे मिश्रण असते. अशा मलमांमध्ये स्टेरॉईड असल्याने खाज पटकन कमी झाली, तरीही त्वचेतील बुरशी मात्र झपाट्याने पसरते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये नेहमी वापरण्यात येणाऱ्या औषधांना हे जंतू दाद देत नाहीत (ड्रग रेझिस्टन्स), तसेच कमी वेळेत बरे होऊ शकणारे जंतुसंसर्ग दीर्घकाळ सतावत राहाते. घरातील लहान मुलांना किंवा गरोदर स्त्रियांना हा जंतुसंसर्ग झाल्यास औषधे देणे सुद्धा कठीण ठरते. त्यामुळे वरकरणी गंभीर न वाटणाऱ्या या आजाराकडे नीट लक्ष देऊन वैद्यकीय सल्ल्याने औषधोपचार करणे गरजेचे असते. 
(उद्याच्या अंकात वाचा - त्वचारोग प्रतिबंधासाठी काय करावे?) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com