मनातला कोरोना : कोरोनाके साथ भी और कोरोनाके बाद भी...

Anand Nadkarni
Anand Nadkarni

ONE DAY AT A TIME चे सगळ्यात छोटे एकक म्हणजे Unit कुठले?... प्रत्येक क्षणी, तेवढाच क्षण. कोरोनाच्या काळामुळे इतकी सवय लागली आणि टिकली तरी पुरे की. नकारात्मक भावनेचा स्वीकार म्हणजे काय? तर दुसऱ्या कुणाच्या किंवा नशिबाच्या अकाऊंटवर बील न फाडता त्या भावनेची जबाबदारी घ्यायची. त्यानंतर सांगायचं, की कोणतीही भावना परमनंट नसते, कायमची नसते. दुसरे म्हणजे त्या त्या वेळेला जी भावना आपल्याला बलवत्तर भासते किंवा अनुभवायला येते, ती फक्त त्या वेळची Dominant भावना असते. म्हणजेच जरी नैराश्‍य या भावनेत आपण संपूर्णपणे बुडत असलो तरी आशा म्हणजे Hope नावाची भावना असतेच.

तर आपल्यासमोरचा पहिला पर्याय हा, की सध्याच्या ताकदवान नकारात्मक भावनेमुळे अंग चोरून, दाटीवाटीने उभ्या असणाऱ्या इतर भावनांकडे पाहायचे. एकाकीपण भरून आलेलं असतानाही, जवळच्या व्यक्तीच्या प्रेमाच्या आठवणी जळालेल्या कापरासारख्या तरंगत असतात. संतापाच्या अग्रक्षणानंतर, त्याच व्यक्तीबद्दलचा आपुलकीचा थेंब, चेहऱ्याच्या आत रुजलेला असतो. Remember No painful Emotion is alone. शोधूया...

शोधूया... सापडेल... ती तिरीप सापडली तर तिला खतपाणी घालता येईल. कसलं? ध्येयाकडे नेणाऱ्या विचारांचं, आणि ध्येयाचाच गोंधळ असेल तर... अस्तित्व जपायचं आहे मला इतकं ध्येय चालेल. आणि अस्तित्वच निरर्थक वाटत असेल तर... तर तीही फक्त आत्ताची भावना आहे असं म्हणायचं. कायमची नाही. दुसरा पर्याय आहे, समोरच्या दुःखद भावनेची फक्त पट्टी बदलायची, परिस्थितीमुळे आलेले नैराश्‍य, समोरच्याच्या वागण्यामुळे झालेली चिडचिड, वाटणारी चिंता. या असह्य भावनांना सह्य पातळीवर आणायचं. पहिला मंत्र I can stand it. अनंत आमुचि ध्येयासक्ती, अनंत अन्‌ आशा, किनारा तुला पामराला. दुसरी गोष्ट, या भावना आपल्यात आल्या म्हणून आपण रद्दी माणूस नाही झालो. आपण माणूस होतो, माणूस आहोत, माणूसच राहणार. पण नैराश्‍य आणि चिंतेमध्ये इतका ठाम वाटणारा एकमेव दुःखद परिणाम घडणारच याची तरी शाश्‍वती आहे का? नाही ना, जोपर्यंत तसं घडत नाही, तोवर त्याला शक्‍यतेच्या पातळीवर ठेवणे तर मला शक्‍य आहे. मी सजग, सावधान राहू शकतो, सापडली की सह्य भावनांची रांग. अशी सारी मांडणी रुग्णमित्रांसमोर करत गेलो. सत्र संपल्यावर एकजण म्हणाला, ‘‘घरचे निदान चार दिवस तरी नाही येऊ शकणार न्यायला म्हणून खूप वाईट वाटत होतं. पण आता वाटतंय, I Can stand it.’’ दुसरा म्हणाला, ‘‘माझ्या लक्षात येतंय, की बाहेरचा लॉकडाउन वाढला तरी आपण ठीक कसं राहायचं.’’ ‘‘भावनांचे योग्य नियोजन करायला शिकणं ही गोष्ट आपण जर कोरोनाच्या निमित्ताने शिकलो. आणि ते पुढे सुरू ठेवलं तरच आपल्या सवयी बदलतील.’’ म्हणजेच काय, मी म्हणालो, ‘‘कोरोनाके साथ भी और कोरोनाके बाद भी’’  सर्वांनी माझ्या सुरात सूर मिसळविला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com