#MokaleVha : सेलिब्रेशन

डॉ. अस्मिता दामले
Sunday, 4 October 2020

सुषमा धपकन समोर येऊन बसली.
‘काय गं, घरात काही प्रॉब्लेम?’ 
‘नाही, सगळं छान आहे.’ 
‘मग ऑफिसमध्ये?’ 
‘मी ग्रेडसाठी परीक्षा दिली होती. त्याचा रिझल्ट लागला आणि मला प्रमोशन मिळाले. पण बघा ना प्रमोशन डिक्लेअर झाल्या-झाल्या मी आमच्या ग्रुपवर पोस्ट शेअर केली. पण एकाचाही फोन आला नाही.’ 

सुषमा धपकन समोर येऊन बसली.
‘काय गं, घरात काही प्रॉब्लेम?’ 
‘नाही, सगळं छान आहे.’ 
‘मग ऑफिसमध्ये?’ 
‘मी ग्रेडसाठी परीक्षा दिली होती. त्याचा रिझल्ट लागला आणि मला प्रमोशन मिळाले. पण बघा ना प्रमोशन डिक्लेअर झाल्या-झाल्या मी आमच्या ग्रुपवर पोस्ट शेअर केली. पण एकाचाही फोन आला नाही.’ 
‘अरेच्या म्हणून रुसवा आहे का?’
‘बघा ना आमचा खूप वर्षांपासून ग्रुप आहे. म्हणून वाटतं ना. मी काही छान बातमी कळली की लगेच फोन करून कौतुक करते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घट्ट मैत्री म्हणायची, मग एकीने तरी फोन करायचा ना! काही वेळेस ३-४ जणी एकत्र जमून गप्पा, खाणे अशी मजा करतो. तेव्हापण असाच मला वगळल्याचा फिल येतो.’
‘तुझा दृष्टिकोन बदल. तुझा प्रॉब्लेम त्यांनी फोन केला नाही हा आहे, का तू फोन करतेस म्हणजे त्यांनी पण करायला हवा हा आहे? मला सांग तुला प्रत्यक्ष कौतुक करणे आवडते म्हणून फोन करतेस ना. पण मैत्रिणींनी पण तसेच करावे हे गृहीत धरणे कितपत योग्य आहे?’
सुषमा विचारात पडली. 
‘मला सांग अडचणीच्या वेळी त्या कशा वागतात?’
‘त्या वेळेला सगळ्या धावून येतात. भक्कम आधार देतात.'
‘मग ४-५ जणी एकत्र भेटल्या किंवा आज तुला फोन केला नाही तर तुझे असे वाटणे कितपत योग्य आहे?’
‘हो, खरेच मी गैरसमज करायला नको होता.’
‘आनंदाच्या प्रसंगी सोबत लागतेच, ती हुरूप वाढवते. पण दुःखात, संकटात मदत देणारा हात, डोके टेकवून शांत वाटेल असा खांदा, आणि अश्रू पुसणारे हात हे जास्त महत्त्वाचे असतात. मैत्री म्हणजे दुसऱ्याला गृहीत धरणे नाही तर परस्पर समन्वय आणि गुणदोषांसकट स्वीकार होय. मैत्री ही उघड्या पुस्तकाप्रमाणे सहज वाचता आली पाहिजे. मैत्री आयुष्यातील सर्वांत सुंदर भेट आहे. तिला गैरसमजाने झाकोळू नकोस. मनावरची जळमटे झटक लख्ख होऊन विचार कर. आपले यश, आनंद हा निखळ आपलाच असायला हवा.’
‘मी चुकीचा विचार करून उदास झाले होते.’
‘हो ना, मग आता तूच सगळ्यांना बोलावून प्रमोशनचे जोरदार सेलिब्रेशन कर आता. ऑल द बेस्ट.'

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article dr asmita damale on celebration