तरुण वयातील स्तनांचा कॅन्सर डॉ. भारती ढोरे-पाटील

तरुण वयातील स्तनांचा कॅन्सर डॉ. भारती ढोरे-पाटील

वुमन हेल्थ
सोनालीच्या (वय ३२) स्तनांच्या आकारातील बदल आणि चिकट स्राव येऊ लागल्याने आईबरोबर स्त्रीरोग तज्ज्ञाकडे तपासायला जाते. नक्की उलगडा न झाल्याने दोघी आणखीन २ ते ३ तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी फिरतात. व्यवस्थित विचार केल्यास त्या तरुण मुलीची आणि कुटुंबीयांची द्विधा मनःस्थिती स्वाभाविकच आहे. 

तरुण वयात स्तनांच्या आजाराचे निदान खरोखरच अवघड असते. त्या वयात स्तनांचा घनदारपणा, म्हणजेच डेन्स टिशूमुळे त्यांच्या मॅमोग्राफीमध्ये नीटसा उलगडा होत नाही. थोडाही उशीर झाल्यास आणि गाठ लक्षात येईपर्यंत तो ॲडव्हान्स स्टेजपर्यंत पोचू शकतो. तरुण वयातील स्तनाच्या कॅन्सरचे अचूक निदान आणि उपचार ही डॉक्‍टरांसाठी तारेवरची कसरतच जणू.

पन्नाशीनंतर होणाऱ्या या कॅन्सरचे प्रमाण आज ३० ते ३५ वयोगटातील तरुणींमध्ये वाढत असल्याचे आढळून आले आहे. त्याचे कारण म्हणजे बदलती जीवनशैली, असंतुलित आहार, कामाचा ताण, वेळी-अवेळी जेवणाचे आणि झोपण्याचे वेळापत्रक. निदानाच्या वेळी वय कमी तसा कॅन्सर ॲग्रेसिव्ह असू शकतो. या कॅन्सरची सुरवात दुधातील ग्रंथीतून निघणाऱ्या वाहिकांमधून होते. सुरवातीला स्तनांमध्ये बदल आणि पीडारहित गाठ व पिंड असणे, अचानक आकार वाढणे, स्तन घट्ट होणे किंवा आकुंचन पावणे, स्तनाच्या बोंडातून द्रव येणे किंवा ती आतमध्ये वळणे आणि दुखू लागणे, ही लक्षणे जाणवतात.

स्तनाच्या कॅन्सरची चाचणी वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. 
सेल्फ ब्रेस्ट एक्‍झामिनेशन : महिन्यातून एकदा प्रत्येक स्त्रीने करावी.
क्‍लिनिकल ब्रेस्ट एक्‍झामिनेशन : तज्ज्ञांकडून वर्षभरातून किमान एकदा करावी.
मॅमोग्राफी (एक्‍सरे अथवा सोनोग्राफीद्वारे) : वर्षानंतर वर्षभरातून करावी.
वरील नमूद केलेले कोणतेही बदल आढळल्यास तातडीने डॉक्‍टरी सल्ला घेणे. 

काय काळजी घ्याल :
सर्वांत स्वस्त आणि नियमित करता येणारी टेस्ट म्हणजे ‘सेल्फ ब्रेस्ट एक्‍झामिनेशन’ प्रत्येक स्त्रीने करावी. 
स्वतःच्या आई वा बहिणीला कॅन्सर होऊन गेला असल्यास वर नमूद केल्याप्रमाणे पूर्व स्क्रीनिंग करावी. 
अधिक चरबीयुक्त, स्नेहयुक्त आहार टाळावा. 
हिरव्या पालेभाज्या आणि फळभाज्या व विविध फळे यांचे नियमित सेवन. 
नियमित व्यायाम, योगासने करावीत. 
मानसिक ताण-तणावापासून मुक्त राहावे.
पुढील भागात उपचार पद्धतीची माहिती घेऊ यात.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com