यकृताचा कर्करोग

Liver
Liver

आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ
यकृताच्या कर्करोगास हिपॅटोसेल्युलर कार्सिनोमा असे संबोधतात. जगात सर्व कर्करोगांमुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये यकृत कर्करोगाचा तिसरा क्रमांक लागतो. जगभरात पाच लाख लोकांना तो झालेला आहे. यकृताचा कर्करोग आशिया आणि आफ्रिका खंडात अधिक आढळतो. सिऱ्हॉसिस झालेल्या सर्व रुग्णांमध्ये हा कर्करोग आढळतो. 

१) व्हायरल हिपॅटायटिस : जगातील ८० टक्के यकृताचे कर्करोग व्हायरल हिपॅटायटिसमुळे होतात. त्यातील ५० टक्के ‘हिपॅटायटिस बी’मुळे तर २५ टक्के ‘हिपॅटायटीस-सी’मुळे होतात. 
२)    विषारी पदार्थ ः मद्य, अप्लाटॉक्‍सिन आणि लोहाचे प्रमाण जास्त असल्यास यकृताचा कर्करोग होतो. 
३)     मेटॉबॉलिक कारणे ः फॅटी लिव्हर तसेच मधुमेहाच्या रुग्णांमध्ये यकृताचा सिऱ्हॉसिस झाल्यास कर्करोग होऊ शकतो. 
४)     जन्मतः आढळणाऱ्या व्याधी : बिल्सन डिसीज, अल्फा १, ॲटिट्रिप्सिनची कमतरता, हिमोफिलिया इत्यादी व्याधींमध्ये यकृत कर्करोग होतो. 
५) अत्यल्प प्रमाणात लिव्हर ॲडेनामो असल्यास जन्मतःच पित्तनलिका आकुंचित असल्यास, तसेच पित्तनलिकेच्या काही व्याधींमुळे यकृताचा कर्करोग होऊ शकतो. 

यकृत कर्करोगाची लक्षणे 
१)     सुरवातीच्या काळात यकृताच्या कर्करोगाची काहीच कारणे आढळत नाहीत. 
२)     पोटाच्या उजव्या बाजूस दुखणे, वजन कमी होणे, भूक न लागणे ही लक्षणे दिसू शकतात. 
३)     कालांतराने कावीळ, जलोदर, रक्ताच्या उलट्या इत्यादी लक्षणे दिसू लागतात. 

निदान कसे करतात? 
सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, हा कर्करोग सुरवातीच्या काळात लक्षात आल्यास योग्य उपचारपद्धती होऊ शकते. त्यामुळेच या कर्करोगाचे प्राथमिक काळात अचूक निदान होणे आवश्‍यक आहे. लिव्हर सिऱ्हॉसिस असणाऱ्या सर्व व्यक्तींना नित्यनियमाने रक्ताच्या चाचण्या उदा. अल्फा फेटो प्रोटिन, desgamma carboxy prothrombin ही चाचणी, यकृतासाठी USG abd (सोनोग्राफी) दर ६ महिन्यांनी करणे आवश्‍यक आहे. वेळप्रसंगी काही शंका असल्यास सीटी स्कॅन अथवा एमआरआय करावा. त्यामुळेच योग्य निदान होते. यकृतातील ट्यूमरची बायोप्सी करण्याची शक्‍यतो आवश्यकता नसते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com