गर्भारपण आणि यकृताचे आजार

pregnancy
pregnancy

आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ
गर्भारपणात कावीळ होणे ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे मातेस व बाळासही इजा होऊ शकते. गर्भारपणात यकृताचे आजार का व कसे होऊ शकतात ते जाणून घेऊया. 

गर्भारपणात शरीरात व अंतर्गत अवयवांच्या कार्यात बरेच बदल घडतात. हे सर्व बदल शरीरातील बदललेल्या संप्रेरकांच्या प्रमाणामुळे असतात. ऑस्ट्रोजेन (Oestrogen) आणि प्रोजेस्टेरॉन (Progesterone) संप्रेरकात बदल घडतात.
१) शरीरातील रक्तपुरवठा वाढल्यामुळे तळहात लालसर होतात. 
२) यकृताच्या आकारमानात बदल घडत नाही. परंतु यकृत बरगड्यांखाली ढकलले जाते आणि तपासताना कधीच जाणवत नाही. 
३) यकृताच्या निगडित रक्तचाचण्यांमध्ये काही बदल घडू शकतात. उदा. अल्कलाइन फॉस्फटेज या चाचणीत व अल्फा फेटोप्रोटिन या ट्यूमरच्या चाचणीतसुद्धा वाढ दिसू शकते, तसेच रक्त अधिक घट्ट होऊ शकते. 

गर्भारपण आणि यकृताच्या व्याधी - 
गर्भारपणामुळे किंवा गर्भारपणात कावीळ किंवा अन्य यकृताचे आजार होऊ शकतात. हे आजार वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास गंभीर रूप धारण करू शकतात आणि मातेचा व तसेच बाळाचा जीव धोक्‍यात आणू शकतात. या व्याधींचे वर्गीकरण खालीलप्रमाणे करता येईल. 

१) गर्भारपणात होणारे यकृताचे आजार
अ) हायपरएमेसिस ग्रॅव्हिडेरम - वरचेवर जास्त प्रमाणात उलट्या आणि मळमळ होते. या आजारात यकृताच्या रक्ततपासणीमध्ये बदल घडू शकतो. लिव्हर एन्झाइमस वाढू शकतात. 

ब) पित्त साठून कावीळ होणे (Intrahepatic Cholestasis) - या आजारात वरचेवर खाज येते. डॉक्‍टरांच्या सल्ल्याने तपासण्या करणे आवश्‍यक असते, अन्यथा प्रसूती लवकर होऊ शकते आणि बाळाच्या वजनावर/ वाढीवर परिणाम होऊ शकतो. 

क) यकृतातील मेदाचे प्रमाण वाढणे - हा आजार गंभीर रूप धारण करू शकतो. यामध्ये पोटात उजव्या बाजूस बरगडीखाली दुखू शकते. उलट्या होणे, कावीळ होणे, संभ्रम होणे, गुंगी येणे, इत्यादी लक्षणे दिसू लागतात. रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते आणि रक्त पातळ होते. अशा वेळी ताबडतोब यकृततज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्‍यक असे. 

ड) हेल्प सिंड्रोम (Hellp Syndrome) - या आजाराची लक्षणे दिसताच वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे. या आजारामुळे पोटात दुखणे, उलट्या होणे, मळमळ होणे, डोके दुखणे, इत्यादी लक्षणे दिसतात. रक्तदाब वाढलेला असू शकतो. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com