आपापला योगमार्ग

डॉ. राजीव शारंगपाणी
सोमवार, 10 जून 2019

या भावना मग विचारांना जन्म देतात. विचार कृतीला जन्म देतात आणि मग शरीर आणि अंतःकरणाचे स्वास्थ्य बिघडायला सुरवात होते.

हेल्थ वर्क
काम, क्रोध, मद, मोह आणि मत्सर हे मनाचे ‘विकार’ होत. आपण या विकारांनी लिप्त आहोत हे समजणे ही मनःस्वास्थ्य नियोजनाची पहिली पायरी. या भावना मग विचारांना जन्म देतात. विचार कृतीला जन्म देतात आणि मग शरीर आणि अंतःकरणाचे स्वास्थ्य बिघडायला सुरवात होते. वरील भावनांचे अंतःकरण ग्रस्त आहे असे समजले की आपला श्‍वास त्याबरोबरच बिघडला आहे असे समजते. मग लक्षपूर्वक श्‍वास पोटाने घेत स्थिर करणे जमायला लागले की याच भावना प्रेमाला जन्म देतात किंवा असे म्हणू की याच भावना प्रेमात रूपांतरित होतात.

गुलाबाचे झाड खताचे रूपांतर सुंदर गुलाबात करते हे तसेच आहे, आध्यात्मिक स्वास्थ्य नियोजनाबाबत गैरसमज आहेत तितके आणखी कुठेही नसतील. याचे कारण विश्‍वनियंत्रित करणाऱ्या शक्तींशी आपला नेमका काय संबंध आहे तो जोपासण्याचे अनेक मार्ग आहेत. ‘मार्ग’ या शब्दामुळे मात्र अनेकांची गफलत होते. हा मार्ग म्हणजे आपण एका वेळेस एकाच रस्त्यावरून जातो तसा मार्ग नव्हे. आध्यात्मिक स्वास्थ्य नियोजनात आपण एकाच वेळेस अनेक मार्गांवरून जाऊ शकतो. किंबहुना जातोच, पण यातील कोणत्याही एक मार्गाचे गुरू आणि त्यांचे अनुयायी अतिशय दुराग्रही बनतात. यातील कोणताही एक योगप्रकार आपल्यास अनुकूल नसेल तर सोडला पाहिजे, तसेच प्रत्येक मार्गातील आपल्या जडणघडणीस आवश्‍यक असे भाग घेऊन आपल्यापुरता एक योगमार्ग बनविणे हे महत्त्वाचे असते. 

(उद्याच्या अंकात वाचा - योगमार्ग देतो अद्वैताचा प्रत्यय)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Rajiv Sharangpani all is well sakal pune today