मुलांची सुटी आणि पालकांचे ‘प्लॅन’ (डॉ. राजीव शारंगपाणी)

डॉ. राजीव शारंगपाणी
सोमवार, 13 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
"शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा" आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा "सकाळ पुणे टुडे"च्या "ऑल इज वेल" पुरवणीत...

आरोग्यमंत्र
सामान्यपणे मुलांना सुटी लागताच आई-वडिलांच्या पोटात गोळा उठतो. आता आपली मुले कशी सांभाळायची आणि त्यांना कसे गुंतवून ठेवायचे, ही चिंता त्यांना त्रस्त करू लागते. ‘शाळा असते तेच बरे असते. निदान अडकलेली असतात,’ अशा प्रतिक्रिया उमटू लागतात. त्यामुळे पालकांसाठी काही विशेष सूचना आवश्‍यक आहेत. त्यामुळे मुलामुलींना होणारा त्रास काही प्रमाणात तरी कमी होईल. काहीतरी करण्याच्या निमित्ताने मुलांना दुसऱ्यावर ढकलून देऊन आपली त्यांच्या त्रासातून सुटका करणे, हा उद्देश मुलांना सुटीच्या वर्गामध्ये घालण्यामागे नसावा. मुलांना सुटी लागली म्हणजे ती आता शाळा नावाच्या एका तुरुंगांतून निदान काही महिन्यांसाठी तरी मोकळी झालेली असतात. अशा वेळी त्यांना पुन्हा एकदा कोंडवाड्यात घालण्याचा दुष्टपणा निदान सुजाण पालकांनी तरी करू नये. सध्याच्या काळात मुलांचे आयुष्य इतके आखीवरेखीव बनले आहे, की ते स्वतःहून वेगळे करणे हा जवळ जवळ गुन्हा झालेला आहे. मुलांची वाढ कशी व्हावी, याचे काही अतिरेकी आडाखे पालकांनी बांधलेले असतात. सुटी लागताच हे आडाखे पूर्ण करण्याची एक संधी मिळाली, असे मानून ते भयंकर प्रकारचे ‘प्लॅन’ करायला लागतात. यात मुलीला किंवा मुला काय हवे आहे, याचा अजिबात विचार नसतो. आपले मूल हे एकसमयावच्छेदन करून सचिन तेंडुलकर, अमजद अली खान, आमीर खान, बिरजू महाराज, एम. एफ. हुसेन, प्रकाश पदुकोण, पी. टी. उषा आणि कमीत कमी आइन्स्टाईन व्हायला हवे, अशी त्यांची इच्छा असते! अशी अनेक मुले दावणीला बांधलेल्या गुरांसाठी एका क्‍लासकडून दुसऱ्या क्‍लासकडे फरपटत असतात. एकदाची सुटी संपते आणि शाळेला तोंड द्यायला मुले पुन्हा सज्ज होतात...

(उद्याच्या अंकात वाचा - जाणून घ्या मुलांची मते)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Rajiv Sharangpani on Childrens Holidays and Parents Plans