अँजिओग्राफी आणि सेकंड ओपिनियन

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 10 September 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!

शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

आरोग्यमंत्र - डॉ. ऋतुपर्ण शिंदे, हृदयविकार तज्ज्ञ
अँजिओग्राफीमधून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपले डॉक्टर आपल्याला कुठल्या प्रकारची उपचारपद्धती योग्य आणि सुरक्षित आहे, ते वस्तुनिष्ठरित्या ठरवू शकतात. हा या चाचणीचा मोठा फायदा म्हणावा लागेल. त्याचप्रमाणे आपण गरज भासल्यास अँजिओग्राफीचा अहवाल आपल्या फॅमिली डॉक्टरांना दाखवून सेकंड ओपिनियन घेऊ शकतो. अशा पद्धतीने सेकंड ओपिनियन घेण्यासाठी प्रत्यक्ष डॉक्टरांकडे जावेच लागते, असेही नाही. आजकाल ई-मेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून सेकंड ओपिनियन घेणे सोपे झाले आहे.

फक्त हे लक्षात ठेवावे की, या प्रक्रियेमध्ये जास्त वेळ न गमावता पुढील निर्णय घ्यावा. कधीकधी आपत्कालीन स्थितीमध्ये प्रत्येक मिनिटसुद्धा महत्त्वाचा असतो. प्रत्येक वेळेला अँजिओग्राफी झाल्यावर अँजिओप्लास्टीच लगेच करावी लागते, असेही काही नाही. हा गैरसमज आहे. बऱ्याचवेळा अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टी एकत्र करणे हा सोयीचा भाग असतो. गरज नाही. त्यामुळे रुग्णाची अवस्था, निकड, धोका आणि गरज भासल्यास सेकंड ओपिनियन याचा सर्वंकष विचार करून पुढील निर्णय आपल्या डॉक्टरांना द्यावा. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Rutuparn Shinde all is well sakal pune today