ब्रह्म मुहूर्त : स्वतःला घडविण्याची वेळ 

सद्‌गुरू, ईशा फाउंडेशन 
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली! 
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

इनर इंजिनिअरिंग 
प्रश्‍न : ब्रह्म मुहूर्ताची अचूक वेळ नक्की काय आहे? त्याचे महत्त्व काय आहे? आणि आपण त्या वेळात जास्तीत जास्त ऊर्जा कशी प्राप्त करून घेऊन शकतो? 

सद्‌गुरू : आपण सूर्यास्त ते सूर्योदय हा कालावधी रात्र म्हणून गृहीत धरला, तर रात्रीचा शेवटचा एक चतुर्थांश भाग म्हणजे ब्रह्म मुहूर्ताचा काल. साधारणपणे रात्री 3.30 ते पहाटे 5.30 किंवा 6 किंवा सूर्योदयाच्या वेळेपर्यंत. 

ब्रह्म मुहूर्ताच्या काळामध्ये काय घडते? 
पृथ्वीचे सूर्य आणि चंद्राबरोबरचे नाते अशा स्वरूपाचे आहे, की मानवी शरीरात या काळात काही विशिष्ट शारीरिक बदल घडून येतात. वैद्यकीय शास्त्राने असेदेखील शोधून काढले आहे, की तुमच्या शरीरातील मलपदार्थ, उदाहरणार्थ लघवीमध्ये, या काळात काही विशिष्ट गुणधर्म आढळून येतात, जे दिवसाच्या इतर कोणत्याही कालावधीमध्ये सापडत नाहीत. याविषयी पुष्कळ संशोधन झालेले आहे. संपूर्ण शरीर विशिष्ट अशा अनुकूल वातावरणात असते आणि नैसर्गिकरीत्या पिनियल ग्रंथीमधून स्रवणारे मेलाटोनिन नावाचे रासायनिक द्रव्य तयार होत असते. आपल्याला याचा उपयोग करून घेता येतो. कारण, ब्रह्म मुहूर्ताच्या काळात पिनियल ग्रंथींमधून हा स्राव सर्वाधिक प्रमाणात होत असतो, ज्यामुळे आपल्या शरीरयंत्रणेला एक सहज स्थैर्य प्राप्त होऊ शकते. 

आधुनिक वैद्यकीय शास्त्रात, मेलाटोनिनकडे मानसिक स्थितीचे नियंत्रक म्हणून बघितले जाते. अनेक वेळा मी तुम्हाला स्वतःमध्ये सहजता आणण्याबद्दल सांगितले आहे. सहजता आणणे म्हणजे तुमच्यात कोठलीही अस्थिरता राहिलेली नाही, तर ही सहजता ब्रह्म मुहूर्ताच्या काळात नैसर्गिकरीत्या साध्य होते. या वेळेत, आध्यात्मिक साधना केल्याने त्याचा सर्वाधिक फायदा मिळतो. ब्रह्म मुहूर्त म्हणजे "निर्मात्याचा काळ.' आपण त्याकडे या प्रकारे पाहू शकतो, ही अशी वेळ आहे, ज्यामध्ये तुम्ही स्वतःला पुन्हा नव्याने घडवू शकता. तुम्ही स्वतःच ब्रह्मण (निर्माता) बनू शकता आणि स्वतःला, हवे त्या प्रकारे घडवू शकता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article by Sadhguru in All is well of Sakal Pune today supplement