sadguru
sadguru

पूर्णत्वाची प्राप्ती (सद्‌गुरू)

इनर इंजिनिअरिंग

कोणत्याही कृतीमुळे परिपूर्णता साध्य करता येत नाही. तुम्ही केलेल्या एखाद्या कृतीमुळे परिपूर्णता लाभणार नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही एकामागून एक; कोणती ना कोणती कृती का करत असता? ती पूर्णत्वाकडे जाणारी वाटचाल आहे.

तुम्ही अतिरिक्त कृती करणाऱ्या लोकांना विचारता की, ते तसे का करत आहेत, त्यावर ते उत्तर देतात, "काय करणार? उदरनिर्वाह, पत्नी, मुले या सर्वांची काळजी कोण घेईल?'' पण सत्य हे आहे, तुम्ही त्याच्या सर्व गरजा भागवल्या, तरी ती व्यक्ती एक दिवससुद्धा शांतपणे बसू शकणार नाही. तीन ताससुद्धा ती व्यक्ती गप्प बसू शकणार नाही! ती काही ना काहीतरी करणारच. त्याचे कारण असे, की तुमच्या आंतरिक स्वरूपाने अजून परिपूर्णता प्राप्त केलेली नाही आणि तुम्ही कृतीद्वारे तसे करण्याचा प्रयत्न करत आहात.

तुमच्या हातून घडणारी कृती तुमचे अन्न किंवा तुमची सुखे या करता नसून; त्या सर्व परिपूर्णतेच्या शोधात घडत आहेत. हे जाणीवपूर्वक घडले असेल किंवा अजाणतेपणे घडले, पण त्या कृती अमर्याद होण्याचा शोध सूचित करतात. तुमच्या आंतरिक स्वरूपात पूर्णत्व असेल, तरच तुमचे आयुष्य परिपूर्णता प्राप्त करू शकेल. तुमच्यात तुमच्या आंतरिक स्वरूपाने पूर्णत्व प्राप्त केले असल्यास तुम्हाला कोणत्याही बाह्यकृतीची आवश्‍यकता भासणार नाही. बाह्य परिस्थितीने काही कृतीची मागणी केली, तर तुम्ही ती आनंदाने करू शकता. तसे करण्याची आवश्‍यकता नसल्यास तुम्ही शांतपणे डोळे मिटून बसू शकता.

एखादी व्यक्ती अशा अवस्थेला जाऊन पोचल्यावर तिला कोणतीही कृती करण्याची आवश्‍यकता भासत नाही. त्यावेळी ती व्यक्ती असीम, अमर्याद झाली आहे, असे आपण म्हणू शकतो. याचा अर्थ असा नाही की, ती व्यक्ती अजिबातच काही काम करत नाही. बाह्य परिस्थितीची तशी मागणी असल्यास ती चोवीस तासही काम करेल. मात्र, आंतरिक पूर्ततेसाठी तिला कृतीची आवश्‍यकता नाही. ती कृती करण्यासाठी बांधील नाही. कृतीरहित सुद्धा ती व्यक्ती परिपूर्ण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com