‘हिपॅटायटिस सी’ टाळण्यासाठी...

hepatitis
hepatitis

आरोग्यमंत्र - डॉ. शीतल महाजनी-धडफळे, यकृततज्ज्ञ
या आजारावर प्रभावी औषधे उपलब्ध आहेत. बारा वर्षांवरील प्रत्येक बाधित व्यक्तीला या गोळ्या देणे जागतिक आरोग्य संघटनेने (who) आवश्‍यक केले आहे. यकृत तज्ज्ञांच्या सल्ल्याने ही औषधे गोळ्या अथवा इंजेक्शन स्वरूपात घेता येतात. या आजारावर लस उपलब्ध नाही. या आजाराच्या रुग्णांनी यकृत कर्करोगासाठी असलेल्या नियमित चाचण्या करणे आवश्‍यक आहे. उदा. अल्फा फेटोप्रोटिन आणि सोनोग्राफी इ. 

या आजाराची लागण कशी टाळता येईल? 
१.     वैद्यकीय उपचारादरम्यान सुया, सीरिंजची योग्य विल्हेवाट लावल्यास तसेच निर्जंतुकीकरणाची योग्य खबरदारी घेतल्यास ही लागण टाळता येईल. 
२.     रुग्णालयातील कचरा निवारण करणाऱ्या नोकरवर्गाने योग्य काळजी घेतल्यास ही लागण टाळता येईल. 
३.     रक्तसंक्रमणाच्या वेळी एचआयव्ही, एचबीव्ही, एचसीव्ही या चाचण्या आवश्‍यक कराव्यात. 
५.     आरोग्य अधिकाऱ्याचे तसेच आरोग्य कामगारांना योग्य प्रशिक्षित केल्यास. 
६.     योनी संबंधाच्या वेळी रक्ताशी संपर्क टाळल्यास आणि कंडोमसारखी सुरक्षित साधने वापरल्यास हा आजार टाळता येईल. 

मद्यपान आणि यकृताचे आजार
आधुनिकीकरणाबरोबरच अनेक सामाजिक चालीरीती तसेच सवयी बदलल्या आहेत. त्यातील एक महत्त्वाचा बदल म्हणजे मद्यपानाला मिळालेला सामाजिक प्रतिष्ठा. मद्यपान हा एक स्टेट्स सिम्बॉल किंवा फॅशन झाली आहे. सध्याच्या काळात वाइन टेस्टिंगसारख्या गोष्टी अधिक सुलभपणे आढळतात. जास्तीत जास्त लोक या गोष्टींच्या आहारी जातात. मद्यपानामुळे मन, शरीरावर होणारे परिणाम माहीत आहेत. मद्यपानामुळे यकृतावर होणारे दुष्परिणाम जाणून घेऊयात. मद्यपानामुळे होणारे यकृताचे आजार ‘अल्कोहोलिक लिव्हर डिसीज’ म्हणून संबोधले जातात. 

अल्कोहोलिक लिव्हर डिसीजचे प्रमाण -
भारतीयांमध्ये या आजाराचे प्रमाण खूप आहे. परंतु, निश्‍चित आकडेवारी उपलब्ध नाही. एका सर्वेक्षणामध्ये भारतीयांमध्ये मद्यपानाचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ३० ते ५० टक्के आहे. स्त्रियांमध्येही ते ५ टक्के आहे. हा नक्कीच एक मोठा धोका आहे. संपूर्ण जगामध्ये या आजाराचे एक तृतीयांश प्रमाण केवळ मद्यपानामुळे आहे. त्याचप्रमाणे जगभरात सुमारे २५ लाख लोक दरवर्षी मद्यपान केल्यामुळे दगावतात. त्याचप्रमाणे, जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणाप्रमाणे संपूर्ण  जगातील १४ कोटी लोक मद्यपानाच्या व्यसनाचे बळी आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com