#MokaleVha : पतीचे अनैतिक संबंध

Smita Joshi
Smita Joshi

पतीचे अनैतिक संबंध
माझ्या पतीचे त्याच्या ऑफिसमधील मैत्रिणीबरोबर अफेअर चालू आहे. सध्या घरूनच तो काम करीत असल्याने त्यांच्या चॅटिंगमधून मला हे समजले. मी याबाबत कोणती कार्यवाही करू?

पतीच्या अफेअरबद्दल तुम्हाला समजले असले तरी त्यावर लगेच कार्यवाही करण्याची घाई करू नका. तो असे का वागतो आहे हे जाणून घ्या. त्याचे वागणे योग्य नाही हे खरे असले तरी घाई करून कोणती भांडणे किंवा कायदेशीर कार्यवाही केली तर तुमचा संसार मोडू शकतो. आपल्या माणसाकडून चूक झाली तर त्याला योग्य मार्गावर आणण्याचे काम आपलेच असते. पती किंवा पत्नी यापैकी कोणीही चुकत असेल तर एकाने दुसऱ्याला समजावून सांगायला हवे, त्याला योग्य मार्गावर आणायला हवे. शांततेने घेतले तर सर्व गोष्टी आपल्या मनासारख्या होतील पण त्यासाठी संयम ठेवायला हवा.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्रियकर ब्लॅकमेल करतोय
माझे एका मुलावर प्रेम आहे. सध्या त्याची नोकरी गेली आहे. दोन वर्षांपासून आम्ही रिलेशनशिपमध्ये आहोत. त्याचे सध्याचे वागणे योग्य नाही आणि मला ही रिलेशनशिप पुढे न्यायची नाही. परंतु, त्याला मी आता सांगू शकत नाही. तो मला ब्लॅकमेलही करतो. हे सर्व मी कसे थांबवू?

गेली दोन वर्ष त्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये असल्यामुळे आता हे सर्व कसे थांबवू हा प्रश्न तुला पडलेला आहे. परंतु तुला हे रिलेशन पुढे न्यायचे नसेल आणि त्याची खरी ओळख तुला आता पटली असेल तर या सर्व गोष्टी इथे थांबायलाच हव्यात. आपल्या दोघांचे पुढे जमणार नाही, हे त्याला स्पष्टपणे सांगून टाक. तो ब्लॅकमेल करीत असेल तर तू तुझ्या आई-वडिलांना सर्व गोष्टीची कल्पना दे. तुझ्याकडून चूक झालेली आहे, हे त्यांच्यासमोर कबूल कर आणि मग त्यांची मदत घेऊन त्या मुलाचे सर्व संबंध तोडण्याचे प्रयत्न कर. तरीही तो मुलगा ऐकत नसेल तर तुला पोलिसांची अथवा कायद्याची मदत घ्यावी लागेल. गरज पडल्यास तीही मदत घे. पण कोणत्याही परिस्थितीत नको असलेले नाते पुढे नेऊ नकोस.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com