#MokaleVha : गरज आत्मभानाची

Mokale-Vha
Mokale-Vha

‘वसुधा... अगं तुझा मुलगा अजून खूप लहान आहे. त्याला तुला वाढवायचं आहे. तुझी आई वयस्कर, तुला वडील नाही, भाऊ नाही, बहिणीच्या लग्नाची जबाबदारी आहे, असं असताना तू कोणतीही पोटगी न घेता घटस्फोट घ्यायला कशी तयार झालीस? तुझं शिक्षण कमी, नोकरी नाही अशा आर्थिक परिस्थिती, तुझ्या जबाबदाऱ्या तू कशी पूर्ण करणार? कायद्याने तुला तुझा हक्क मागता येईल. तुझ्यासाठी आणि तुझ्या मुलासाठी तुला तुझ्या नवऱ्याकडून पोटगी मागता येईल; त्याचे स्वतःचे घर, शेती किंवा इतर मिळकत असेल, तर तुला त्याचे पुरावे देऊन एकरकमी पोटगीचीही मागणी करता येईल. कायद्याचं संरक्षण असताना स्वतःसाठी आणि मुलांसाठी पोटगी मागण्याचा हक्क का सोडून देतेस? पुन्हा एकदा या सर्व गोष्टींचा विचार कर. 

वसुधाला कायद्यातील सर्व तरतुदींची जाणीव करून दिली; पण तरीही तिला नवऱ्याकडून पोटगी नको होती. फक्त घटस्फोट हवा होता. तिनं दिलेलं उत्तर थक्क करणार होतं. ‘‘मॅडम, माझं शिक्षण कमी आहे, मला माहेरचा आधार नाही उलट जबाबदारी आहे, माझी आर्थिक परिस्थिती बरी नाही; पण मला स्वाभिमान आहे. त्याने दिलेल्या पोटगीवर मी जगणार नाही. मला ती पुरणारही नाही. मी शिकेन, कोणतही काम करेन, माझ्या मुलाचा आणि माझ्या माहेरच्यांचा आधार बनेन. माझ्याकडे पैसा नाही; पण हिम्मत आहे. देवाने चांगले हातपाय दिले आहेत. त्या हातातलं बळ वाढवल म्हणजे झालं. त्याची संपत्ती आणि त्याचे पैसे त्यालाच लखलाभ. मला काहीही नको. त्याच्या मर्जीने त्याला मुलासाठी जेव्हा काही द्यायच असेल तेव्हा देऊदेत; पण कायद्याचा आधार घेत मला माझा हक्क ओरबडून घ्यायचा नाही.’’

पोटगीच्या पैशासाठी वर्षानुवर्षे भांडणाऱ्या स्त्रिया न्यायालयात बघायला मिळतात; पण वसुधासारख्या आत्मभान जागृत ठेवून स्वामिान जपणाऱ्या स्त्रिया फारच कमी दिसून येतात. स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आत्मभान जागृत करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कायदा स्त्रीच्या संरक्षणासाठी आहे. तिचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठीच काही कायदे स्त्रियांसाठी अस्तित्वात आलेले आहेत; पण केवळ कायदे करून चालणार नाही; तर त्याच्या अंमलबजावणीसाठी पुरुषांची आणि स्त्रियांचीही मानसिकता बदलणे आणि त्या कायद्याचा उद्देश साध्य करणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीला स्वतःच्या स्वाभिमासाठी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र असणे किमान काहीतरी स्वकमाई असणे आवश्‍यक आहे. कौटुंबिक न्यायालयात न्यायप्रविष्ठ असलेल्या प्रकरणातील महिलांनी केवळ पोटगीवर अवलंबून न राहता स्वतः सक्षम व्हावे. केवळ रडत न बसता परिस्थितीशी लढायला शिकावे. याकरिताच स्वयंसिद्धा हा उपक्रम चालू केलेला आहे.

अनेक गरजू महिलांना कौशल्य प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुणे कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या गांधी भवन आणि रोटरी क्‍लब ऑफ मेट्रो या उपक्रमाला आर्थिक सहकार्य करीत आहेत. यातून महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करणे अथवा रोजगार उपलब्ध करून देणे यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. 

अर्थातच, स्त्रीला केवळ आर्थिक स्वातंत्र्याची गरज नसून वैचारिक स्वातंत्र्याचीही गरज आहे हे लक्षात घ्यायला हवे. कारण कमतवत्या स्त्रीला तरी घरात निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे का? जोपर्यंत स्त्री दुय्यम आहे असे मानणाऱ्या पुरुषांच्या मानसिकतेमध्ये बदल होत नाही तोपर्यंत स्त्रीला वैचारिक स्वातंत्र्य मिळणार नाही. कर्तृत्वान पत्नीबद्दल आदर न बाळगता तिच्याबद्दल वाटणारी असूया आणि त्यातून तिचा होणारा विकृत छळ. इतर काहीही मिळाले नाही तर तिच्या चारित्र्यावर आरोप करून किला नामोहरम करणे इत्यादी अनेक घटना आपण वारंवार ऐकल्या आहेत. समाजाच्या दृष्टीने महत्त्वाची असते ती ‘कौटुंबक चौकट’ आणि या चौकटीत सामावून घेण्यासाठी तिचा आंतरिक छळ ती सहन करीत राहते. कितीही उच्च स्थानावर पोचली तरी कुटुंब सोबत नसेल तर समाजाचा त्या स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. म्हणूनच कुटुंब वाचवण्यासाठी ती धडपडत राहते. अनेक स्त्रिया स्वतःचं मत प्रकट करीत नाहीत. स्वतःचं दुःख कोणाला सांगत नाहीत. बहिणाबाईंच्या कवितेच्या ओळीप्रमाणे, 
‘माझं सुख माझं सुख हंड्या झुंबरं टांगलं
माझं दुःख माझं दुःखं तळघरात कोंडलं.’

त्या काळात त्यांनी लिहिलेल्या या काव्यपंक्ती अजूनही स्त्री जगते आहे. यासाठीच स्त्रीने तिचे आत्मभान जागृत करणे महत्त्वाचे आहे. स्त्री जात्याच ‘हळवी’ असते, असे म्हटले जाते; परंतु त्याचप्रमाणे कठीण प्रसंगात कणखर राहून ती अवघड प्रसंगालाही सामर्थ्याने तोंड देऊ शकते. म्हणूनच बदलाच्या प्रत्येक टप्प्यावर ती आयडॉल म्हणून उभी राहिली आहे. आदर्श माता म्हणून जिजाऊ, स्वतःच राज्य वाचवणारी राणी लक्ष्मीबाई, सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या सावित्रीबाई फुले, स्वातंत्र्याच्या चळवळीतील सरोजिनी नायडू राजकारणातील इंदिरा गांधी. या प्रत्येकीने बदलाच्या उंबरठ्यावर आपापली प्रतिमा ठसठशीतपणे उमटवलेली आहे. यांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून कणखर व्हायला हवे. स्वतःची मानसिकता बदलायला हवी. 

स्त्रीने स्वतःची ओळख असण्याची गरज आहे. यासाठी पुरुषांशी स्पर्धा करायची नाही. बऱ्याच वेळा पुरुषांपेक्षा श्रेष्ठ व्हायचे, स्वतःला सिद्ध करायचे या गटातील यिा प्रत्येक वेळा पुरुषांशी बरोबरी करतात. घरातील कर्तव्य विसरून जातात. घरातील स्वयंपाक, मुलांची देखभाल या काही गोष्टी स्त्रियांना अधिक चांगल्या जमतात. ड्रायव्हिंग, अंगमेहनतीची कामे पुरुषांना अधिक चांगली जमतात. हा फरक राहणार आणि काही गोष्टींचा स्वीकार करणेही गरजेचे आहे. बदल घडवून यायलाही वेळ लागणार आहे. यासाठी स्त्रीने स्वतःच्या व्यक्तिमत्त्वातील स्त्री हरवू न देता पुरुषी सद्‌गुणांची जाणीवपूर्वक जोपासना करायला हवी. महिला दिनाच्या निमित्ताने स्त्रीने स्वतःच्या मानसिकतेत बदल करून घडवून आणणे महत्त्वाचे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com