खरे नेतृत्व...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मे 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग
नेतृत्व म्हणजे लोकांबद्दल प्रेम आणि करुणेची सशक्त अभिव्यक्ती होय. नेतृत्वामधून तत्त्वांमधील बांधिलकी दिसते. या दृष्टीने प्रत्येकातच काही प्रमाणात नेतृत्वगुण असतात. या गुणांचे पोषण करणे, हे खरे आव्हान असते. एक खरा नेता, मग तो राजकीय असेल किंवा धार्मिक, सामाजिक त्याला अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रत्येक व्यक्तीनुसार नेत्याची ही बांधीलकी बदलत असते. एखाद्याच्या आवडीनिवडीमुळेही यात फरक पडतो. तरीही, नेत्याला प्रत्येकाकडे सारख्याच दृष्टिकोनातून पाहावे लागते. एकाच फूटपट्टीने सर्वांचे महत्त्व ओळखावे लागते. त्याला भेदभाव शोधावा लागतो, त्याप्रमाणे योग्य वेळेवर योग्य कृती करण्यासाठी आवश्‍यक असलेले शहाणपणही त्याच्याकडे हवे. तो राहणारा समाज आणि प्रतिनिधित्व करणारा गट एकजिनसी नसतो आणि तो प्रत्येकाला समाधानी बनवू शकत नाही. तरीही, नेत्याला प्रत्येकाला सोबत घ्यावे लागते आणि प्रत्येकाला न्यायही द्यावा लागतो. नेत्याने टीकेचा भडिमार सहन करत कुठल्याही परिस्थितीत भावनिक प्रतिक्रिया देऊ नये. बहुतेकदा नेते खुशामत करणाऱ्यांच्या गराड्यात असतात. ते आपल्या वैयक्तिक हितासाठी नेत्याच्या अहंकाराला खतपाणी घालतात. नेत्याला आपल्या आजूबाजूच्या लोकांवर अवलंबून राहावे लागतेच. त्याच वेळी, त्याने स्वतःला आपल्या जवळच्या सहकाऱ्यांसोबत एखाद्या गढीत बंदिस्त करून घेऊ नये.

त्याचप्रमाणे स्तुतिपाठकांच्या कैदेतही अडकू नये. एखाद्या नेत्याचा सर्वाधिक चांगला गुण म्हणजे आपल्यावरील टीका संयमाने ऐकून घेणे. यशाबरोबर अपयशही सारख्याच समानतेचे घेतो, तोच खरा नेता होय. खरा नेता कधी तक्रार करत नाही, तसेच स्पष्टीकरणही देत बसत नाही.

त्याचप्रमाणे, तो नेहमीच नव्या गोष्टी शिकण्यास तयार असतो. तो दुसऱ्यांवर दोषारोप करत नाही. खरा नेता अल्पकालीन गरजा लक्षात घेऊन विचारधारा आणि व्यावहारिकदृष्ट्या शक्‍य असलेल्या दीर्घकालीन उद्दिष्टांचे संतुलन साधतो. केवळ विचारधारेला चिकटून बसणारे नेते होऊ शकत नाहीत. त्याचप्रमाणे, कुठल्याही विचारधारेशिवाय खूप व्यावहारिक राहणाऱ्यांमध्येही नेतृत्व विकसित होऊ शकत नाही. नेत्याला तो नेतृत्व करत असलेला देश, गट, समुदायाच्या विकासाची दृष्टी आणि लोकांकडे वैयक्तिक लक्ष यातील संतुलन साधावे लागते. आदर्श नेत्याला आपला कमकुवत वेळही ओळखता यायला हवा. लोक खुल्या मनाने आपल्याला स्वीकारतील, हे त्याने समजून घ्यायला हवे. लोक त्याच्या या सरळमार्गी वृत्तीचे कौतुक करत त्याचे दोष स्वीकारतील. काही नेते अतिशय सरळ असतात, तर काही अतिशय मुत्सद्दी. सामान्यतः अतिशय सरळमार्गी असणाऱ्या नेत्याला अनुयायी मिळत नाहीत. एखाद्या गिटारच्या तारा अति ताणल्यावर ते नीट वाजू शकत नाही, तसेच त्या अतिशय ढिल्या सोडल्यावरही संगीत निर्माण होणार नाही. नेत्याला सरळमार्गी वृत्ती आणि मुत्सद्दीपणाची योग्य सांगड घालता यायला हवी. नेत्याने इतरांचे योगदान मान्य करतानाच त्याचे श्रेय त्यांच्या हातात न जाण्याची दक्षताही घ्यावी. महात्मा गांधी, नेल्सन मंडेलासारखे प्रेरणादायी, बुद्धिमान नेते आंदोलने उभी करतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article sri sri ravishankar all is well sakal pune today