अणूपासून पूर्णत्वाकडे...

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 12 September 2019

आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली!
शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक स्वास्थ्यासाठी श्रीश्री रविशंकर, सदगुरू, श्रीगुरू बालाजी तांबे, डॉ. जगन्नाथ दीक्षित, डॉ. राजीव शारंगपाणी अशा आरोग्य क्षेत्रातील सर्व तज्ञ्जांचे मार्गदर्शनपर लेख वाचा 'सकाळ पुणे टुडे'च्या 'ऑल इज वेल' पुरवणीत...

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
मन हे ‘जास्त’ वर जगते. ‘जास्त, आणखी जास्त’ने दुःखाची सुरवात होते. दुःख तुम्हाला कठीण आणि ढोबळ बनवते. ‘स्व’ हा सूक्ष्म आहे. ढोबळाकडून सूक्ष्माकडे जाण्यासाठी तुम्हाला अतिसूक्ष्म माध्यमातून जावे लागते.

तिटकारा, तिरस्कार, मत्सर, आकर्षण किंवा मोह यांवर मात करण्यासाठी तुम्हाला अणूकडे जावे लागते. अणूकडे जाणे म्हणजे या सर्वांमधील अगदी छोट्या भागाचा स्वीकार करणे. तुम्हाला आवडत नाही त्याचा स्वीकार करणे कठीण असेल, पण त्यातील अगदी छोट्या कणाचा, अणूचा नक्कीच स्वीकार करू शकता. तुम्ही तो अणू स्वीकारता त्या क्षणी तुम्हाला बदल घडून आलेला दिसेल. हे ध्यानस्थ स्थितीमध्ये करायला हवे. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता, ते तुम्हाला जास्तीत जास्त हवे असतात. पण मिळाले तरीही समाधान नसते. तुम्ही त्या व्यक्तीचा फक्त एक अणू घेता. तो तुम्हाला समाधान देण्यास पुरेसा असतो. नदी प्रचंड मोठी असली, तरी एक छोटासा घोट तुमची तहान भागवतो. पृथ्वीवर भरपूर अन्न उपलब्ध आहे, तरी त्याचा एक छोटासा अंश तुमची भूक भागवतो. या सगळ्यातून जाणवते की तुम्हाला गरज आहे ती अगदी छोट्या तुकड्याची.

जीवनात प्रत्येक गोष्टीच्या छोट्याशा तुकड्याचा स्वीकार करा. ते तुम्हाला समाधानी करतील. प्रत्येक अनुभवाची पूर्णता होते. पूर्ण होणे म्हणजे शून्यत्वाकडे किंवा काही नसण्याकडे नेणे. आयुष्यात प्रगतिपथावर असताना तुम्ही प्रत्येक अनुभव ‘हे काहीच नाही’ असे म्हणत मागे टाकाल. पूर्ण होते त्याचे महत्त्व कमी होते. म्हणजेच तुम्हाला शून्यत्वाकडे नेते. ‘हे काहीच नाही,’ याची समज तुम्हाला किती लवकर येते, त्यावरून तुमच्या बुद्धिमत्तेचा अंदाज येईल. आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचे परीक्षण करा आणि म्हणा, ‘हे काहीच नाही’ आणि शेवटी उरते ते प्रेम आहे. तेच सगळे आहे. ‘हे काहीच नाही’ हे ज्ञानातून येत नाही, ते दुःखातून येते. ज्ञानातून येवो अथवा दुःखातून, कसेही असले तरी ‘हे काहीच नाही,’ या मुद्द्यावर तुम्ही आलात, की निवड तुमची आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article Sri Sri Ravishankar all is well sakal pune today