आभार आणि कृतज्ञता

Thank-You
Thank-You

चेतना तरंग - श्री श्री रविशंकर, प्रणेते, आर्ट ऑफ लिव्हिंग
आभार मानण्यासाठी वेगळेपणाची गरज असते. आपण आभार मानतो तिथे द्वैत असते. तुम्ही मनापासून आभारी असाल, तर त्याचा अर्थ तुम्हाला आतून वेगळेपणा जाणवतो. अंतःकरणापासून आभार मानण्याची गरज नसते. कारण तेथे अद्वैत असते. पण, तुम्ही वरवरचे आभार मानू शकता.

आभार हे पाण्याच्या पृष्ठभागावरील तरंगाप्रमाणे आहेत. तुम्ही म्हणता, ‘तुमचा आभारी आहे,’ तेव्हा तुम्ही काहीतरी पूर्ण करता. तुम्ही एक देवघेव, एक नातेसंबंध, एक प्रक्रिया संपवत असता. ‘आभारी आहे.’ हे निरोप घेण्यासारखे आहे. तुम्ही सर्व देवघेव वरवरच्या स्तरावर पूर्ण करू शकता, पण आतमध्ये खोलवर फक्त अद्वैत आहे. आभारी असणे हे नेहमी दुसऱ्या कशाच्या तरी तुलनेत असते. अजिबात काही नसल्यास तुम्ही आभार मानत नाही, तुम्ही कशासाठी तरी आभार मानता. पण, या बाबतीत काहीतरी असणे हे काही नसण्यापेक्षा कमी आहे. अगदी सखोलपणे पाहिल्यास आभार मानण्याला काही अर्थ नाही. आपण दुसऱ्या हाताचे आभार मानतो का? तुम्ही खोलवर गेल्यावर दिसेल, की आभार मानायला दुसरे कोणी नाहीच.

कृतज्ञता
आज (वर्तमान) ही ईश्वराकडून मिळालेली देणगी आहे. म्हणूनच याला ‘प्रेझेंट’ (दुसरा अर्थ, उपहार) म्हणतात. इथे तुमच्यामध्ये किती जणांना कृतज्ञता वाटते? तुम्ही कृतज्ञ असाल, तर तुम्ही माझे नाहीत. तुम्हाला कुणी काही दिले आणि तुम्ही आभार मानल्यास तुम्ही स्वतःला त्यांच्याहून वेगळे समजता, असा अर्थ होतो. तुम्ही कधी स्वतःचे आभार मानता का? धन्यवाद देण्याचा अर्थ तुम्ही स्वतःला गुरूचा अंश मानत नाही, असा झाला. लहान मुले आपलेपणा बाळगतात तोपर्यंत त्यांना कृतज्ञ वाटत नाही. ते सगळ्या गोष्टींवर आपला हक्क सांगतात, आपले समजतात. कृतज्ञतेच्याही वर तुम्ही जाता तेव्हा समन्वय घडतो; ‘मी’ही राहत नाही, ‘तुम्ही’ही नाही. तुम्ही गुरूचा अंश आहात. सगळेजण एकच आहेत, एकच आत्मा, ज्याची हजारो मस्तके, हजारो हात आहे. या मार्गावर कृतज्ञ तर व्हायचेच आहे. कृतज्ञता अटळ आहे, पण तुम्हाला कृतज्ञतेच्याही पुढे जायचे आहे. तुम्ही कृतज्ञ राहू नये हेच चांगले. तुम्ही कृतज्ञ राहता, तेव्हा तुम्ही केंद्र बनता. तुम्ही स्वतःला महत्त्वपूर्ण मानू लागता. तुम्ही एखादी सुंदर गोष्ट प्राप्त झाल्याबद्दल ईश्वराचे आभार मानता, तेव्हा जास्त महत्त्वपूर्ण कोण ठरले? तुम्ही की ईश्वर? याचा अर्थ तुमची कृतज्ञता अहंकाराचे दर्शन घडविते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com