बुकीश : ‘द लास्ट गर्ल’ क्रौयाचा पर्दाफाश

सुवर्णा येनपुरे-कामठे
Friday, 10 April 2020

नादिया मुरादला पंचविसाव्या वर्षी शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. यामागे तिचा संघर्ष खूप मोठा होता. ‘इसिस’ने २०१४मध्ये इराकवर हल्ला केला. पुरुष आणि वृद्ध स्त्रियांना गोळ्या घालून मारण्यात आले. या घटनेने संपूर्ण जगातच हाहाकार माजला. इसिसने तरुण मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्यापैकीच एक होती, नादिया मुराद. नादियाने तेथून पळून आल्यानंतर यजिदींसाठी काम करायला सुरुवात केली. तिच्या याच संघर्षासाठी तिला नोबेल पारितोषिक देऊन गौरविले. ‘द लास्ट गर्ल’ या पुस्तकात नादिया मुरादची संघर्ष गाथा मांडली आहे.

नादिया मुरादला पंचविसाव्या वर्षी शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले. यामागे तिचा संघर्ष खूप मोठा होता. ‘इसिस’ने २०१४मध्ये इराकवर हल्ला केला. पुरुष आणि वृद्ध स्त्रियांना गोळ्या घालून मारण्यात आले. या घटनेने संपूर्ण जगातच हाहाकार माजला. इसिसने तरुण मुलींवर लैंगिक अत्याचार केले. त्यापैकीच एक होती, नादिया मुराद. नादियाने तेथून पळून आल्यानंतर यजिदींसाठी काम करायला सुरुवात केली. तिच्या याच संघर्षासाठी तिला नोबेल पारितोषिक देऊन गौरविले. ‘द लास्ट गर्ल’ या पुस्तकात नादिया मुरादची संघर्ष गाथा मांडली आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उत्तर इराकमधील कोचो हे यजिदी लोकांचे गाव. इराकमधील यजिंदीची सामुहिक हत्या होईपर्यंत अनेकांना यजिदी हा धर्मच माहीत नव्हता. सद्दाम हुसेनच्या काळात झालेल्या अत्याचारातून नुकतेच कुठे यजिदी सावरत होते. शेतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नातून जीवनमान सुधारणार नाही, या जाणीवेतून अनेक यजिदी तरुणांनी नोकऱ्या करू लागले. नादिया, थोडीशी हट्टी आणि घरातलं शेंडेफळ! घरात बहीण, भाऊ, त्यांच्या बायका, सावत्र भाऊ असा मोठा परिवार! हेज्नी हा नादियाचा मोठा भाऊ. हळवा आणि तेवढाच कर्तव्यतत्पर!

नादिया व तिचे कुटुंब ३ ऑगस्ट २०१४ रोजी छतावर झोपले होते. त्या रात्री इसिसने संपूर्ण गावाला वेढा घातला होता. ते येताच वेशीवरचे काही लोक सिंजर पर्वतावर पळून गेले. त्यातील काहींना दहशतवाद्यांना ठार केले. इसिसच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी झाला, तो नादियाचा भाऊ हेज्नी! दहशतवाद्यांनी १२ ऑगस्टला सर्वांना गावातल्या शाळेत जमायला सांगितले. त्यांनी बायका व मुलांना वरच्या मजल्यावर, तर पुरुषांना खालच्याच मजल्यावर थांबायला सांगितले. त्यानंतर त्यांना ट्रकमध्ये भरण्यात आले. ट्रक दूरवर निघून गेल्यानंतर गोळ्यांचे आवाज आले. ‘त्यांनी आपल्या पुरुषांना मारलं गं,’ महिलांच्या गर्दीतून कुणीतरी म्हणाले. नादियाचा सावत्रभाऊ सईद व तिथल्या शाळेचे शिक्षक अली यांना गोळ्या लागल्या होत्या, सुदैवाने ते जिवंत होते. दहशतवादी दूर जाईपर्यंत त्यांनी मेल्याचं नाटक केलं. नंतर त्यांनी कसाबसा सिंजर पर्वत जवळ केला.

दुसऱ्या दिवशी त्यांनी तरुण मुलींना वेगळे केले. त्यांना गाड्यांमध्ये भरून मोसूलच्या दिशेने नेण्यात आले. (उर्वरित ज्येष्ठ स्त्रियांना नंतर मारण्यात आले). तिथे त्यांना धर्मांतर करून सबाया म्हणून ओळख दिली गेली. प्रत्येकजण येऊन त्या तरुण मुलींपैकी एकीला निवडत होता. नादिया, तिची भाची कॅथरीन व रोजियानलाही एकाने निवडले. त्यानंतर सुरू झाला तो बलात्काराचा क्रम! एकदा सुटण्यासाठी प्रयत्न करताना पकडली गेल्याने तिला शिक्षा म्हणून चाबकाचे फटके व सहाजणांना तिच्यावर बलात्कार करायला सांगितले गेले. नंतर एकाकडून दुसऱ्याला विकणे जाणे, बलात्कार, मारहाण, उपासमार आणि पुन्हा विकणे हा क्रम चालूच राहतो. तीन महिन्यानंतर ती ज्या माणसाला विकली जाते, तिथून तिला सिरीयाला नेण्याचा कट रचला जातो. तो माणूस नादियासाठी नवीन कपडे आणायला बाहेर पडतो. त्याचवेळी नादिया पळ काढते. रात्र झाल्यावर मदतीसाठी एका घराचे दार वाजवते. ते कुटुंब जिवाची बाजी लावत तिच्या मदतीसाठी तयार होते. त्यानंतर नादियाला सुखरूप बाहेर पाडण्यासाठी हेज्नी मदत करतो.

नादिया आपली कहाणी सांगून क्रौर्य करणाऱ्या या दहशतवाद्यांचा चेहरा सर्व जगासमोर आणते. ती सध्या यजिदींच्या हक्कांसाठी लढणारी कार्यकर्ती आहे. या क्रौर्याचा चेहरा नादियाने ‘द लास्ट गर्ल’ पुस्तकात मांडला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article suvarna yenpure kamthe on the last girl