#MokaleVha चुका टाळण्यासाठी हवी शिस्त!

नरेंद्र गोयदाणी
Sunday, 27 December 2020

मुले व्यसनाधीन होतात यामागची अनेक कारणे आपण सांगू शकतो. मात्र मुख्य कारण काय, याचा सखोल विचार आपण कधी केला आहे का? सातत्य आणि शिस्त हे दोन गुण असतील तरच कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होता येते. मोठ्यात मोठे जहाजदेखील एका लहानशा छिद्राने बुडते. आपल्या आयुष्याच्या जहाजातील हे छिद्र म्हणजे आपल्यातील शिस्तीचा अभाव ठरू शकते. एवढा विचार करण्याची क्षमता किशोरवयीन मुलांमध्ये असेलच असे नाही. मग येथे पालकांची भूमिका महत्त्वाची असते. 

मुले व्यसनाधीन होतात यामागची अनेक कारणे आपण सांगू शकतो. मात्र मुख्य कारण काय, याचा सखोल विचार आपण कधी केला आहे का? सातत्य आणि शिस्त हे दोन गुण असतील तरच कोणत्याही व्यक्तीला आयुष्यात यशस्वी होता येते. मोठ्यात मोठे जहाजदेखील एका लहानशा छिद्राने बुडते. आपल्या आयुष्याच्या जहाजातील हे छिद्र म्हणजे आपल्यातील शिस्तीचा अभाव ठरू शकते. एवढा विचार करण्याची क्षमता किशोरवयीन मुलांमध्ये असेलच असे नाही. मग येथे पालकांची भूमिका महत्त्वाची असते. 

काही सवयी मुलांना यशाची शिडी चढवतात, तर काही सवयी सर्व पात्रता असूनही माणसाला रसातळाला नेतात. अशा अहितकारक सवयींपासून दूर राहण्यासाठी आपल्याला काही शिस्त लावून घेणे उपयुक्त असते. स्मार्टफोन असो किंवा मद्य यांचे व्यसन लागण्यामागचे एक मुख्य कारण मनाला शिस्त नसणे हे आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

साधारण आठ वर्षांच्या आतल्या मुलाला काय चांगले, काय वाईट हे सांगून उपयोग नसतो. त्यामुळे या वयाच्या मुलांना शिस्त लागावी असे वाटत असल्यास तशी शिस्त आधी आपण स्वतःला लावणे आवश्यक आहे. जे मुलांनी करू नये वाटते, ते आपणही करू नये. किंवा जे मुलांनी करावे असे वाटते, तसे आपणही करायला हवे. मुलांमध्ये खूप ऊर्जा असते ती सतत कार्यरत ठेवायला हवी. मुलांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत सतत व्यग्र ठेवावे, म्हणजे मुले चुकीच्या गोष्टीकडे वळणार नाहीत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपले आयुष्य यशस्वी बनविण्यासाठी काही साध्यासोप्या गोष्टी नियमितपणे करणे आवश्यक आहे. वाईट सवयी का लागतात याची चार मुख्य कारणे आहेत. 

  • अस्वस्थता/ताण : जे आपल्या हातात नाही, त्याचा विचार करून आपण अस्वस्थ होतो. मात्र जे आपल्याकडे आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित केले, तर आपला विश्वास वाढतो. म्हणून जे करणे शक्य आहे त्याकडे लक्ष द्या.
  • डोक्याला खाद्य द्या : मुलांना विचार करायला, विचारायला खूप गोष्टी देता यायला हव्यात. त्यांच्या डोक्याला एवढे खाद्य असावे, की चुकीच्या गोष्टीचा विचार करण्यासाठी वेळच असू नये. त्यांना ज्यात आवड आहे त्यात वेगवेगळे पर्याय देऊन त्यांना गुंतवून ठेवा. त्यामुळे त्यांना कंटाळाच येणार नाही. त्यांच्यावर त्यांना पेलतील अशा जबाबदाऱ्या टाका.
  • संगत : मुलांना कुठल्या मित्रांची सांगत आहे, याकडे लक्ष असायला हवे. सगळे मित्र घरी यायला हवेत. मित्र कसे आहेत, कसे वागतात, त्यांचे परिवार कसे आहेत, त्यांच्या सवयी काय आहेत हे बघणे आवश्यक आहे. कारण संगतीचा खूप मोठा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होतो.
  • तत्काळ आनंदाचा शोध : मुलांना ताबडतोब, तत्काळ आनंद हवा असतो. यामुळे कधीही शिस्त लागू शकत नाही. दीर्घकाळ टिकणाऱ्या आनंदाचा शोध घ्यावा, ज्या आनंदात सुख आहे असा आनंद मिळवावा. त्वरित आनंदाच्या शोधात काही चुका हातून घडू शकतात. काही चूक घडल्यास, लगेचच त्यावर काम होणे आवश्यक आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Narendra Goydani on Discipline