#MokaleVha मानसशास्त्राला जोड ड्रामा थेरपीची!

सावनी ओक-काळे, समुपदेशक
Sunday, 27 December 2020

आयुष्यातील काही घटना, मनाला झालेल्या जखमा या इतक्या वेदनादायक असतात, की त्यांना शब्दांत व्यक्त करणे अवघड असते. या जाणिवेतूनच ‘ड्रामा थेरपी’चा उगम झाला. या थेरपीमधून विविध खेळांद्वारे, हालचालींद्वारे, उपक्रमांद्वारे वेदना सांगणं नकळतपणे थोडं हलकं होतं. ही थेरपी जॅकब मोरेनो यांच्या ‘सायकोड्रामा’ या दृष्टिकोनावर आधारलेली आहे. ‘सायकोड्रामा’ या दृष्टिकोनात काही विशिष्ट चिंता किंवा मुद्दे ठरावीक नाट्यमय क्रिया करून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो.

आयुष्यातील काही घटना, मनाला झालेल्या जखमा या इतक्या वेदनादायक असतात, की त्यांना शब्दांत व्यक्त करणे अवघड असते. या जाणिवेतूनच ‘ड्रामा थेरपी’चा उगम झाला. या थेरपीमधून विविध खेळांद्वारे, हालचालींद्वारे, उपक्रमांद्वारे वेदना सांगणं नकळतपणे थोडं हलकं होतं. ही थेरपी जॅकब मोरेनो यांच्या ‘सायकोड्रामा’ या दृष्टिकोनावर आधारलेली आहे. ‘सायकोड्रामा’ या दृष्टिकोनात काही विशिष्ट चिंता किंवा मुद्दे ठरावीक नाट्यमय क्रिया करून दूर करण्याचा प्रयत्न केला जातो. 

ड्रामा थेरपीमध्ये नाटकाच्या प्रक्रियेचा वापर हा छोटे, मोठे मानसिक व शारीरिक आजार दूर करण्यासाठी केला जातो. यामध्ये केवळ ही थेरपी घेणाऱ्यांचा सक्रिय सहभाग अपेक्षित असते. याचा उपयोग सहभागी व्यक्तींना बोलण्यासाठी, अनुभव सांगण्यासाठी, गोष्टी सांगण्यासाठी, ध्येय निश्चित करण्यासाठी, भावना व्यक्त करण्यासाठी होतो. खेळ, भूमिका, रूपकता, सहानुभूती, सादरीकरणाच्या माध्यमातून लोकांमध्ये जाणीवपूर्वक सकारात्मक बदल घडतो.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

ही थेरपी सुरू करण्याआधी थेरपिस्ट सर्वप्रथम त्या गटातील लोकांच्या गरजा समजून घेतो आणि त्यानंतर असे दृष्टिकोन विचारात घेतो, ज्याचा त्या व्यक्तीला फायदा होईल. ही उपचार पद्धती त्या विशिष्ट गटाची किंवा व्यक्तीची गरज बघून, त्यांचे कौशल्य, आवड व क्षमता विचारात घेऊन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे उपचाराची ध्येय जाणून घेऊन वेगवेगळ्या प्रकारे होऊ शकते. प्रत्येक थेरपिस्टची प्रक्रिया वेगळी असू शकते. यामध्ये मुखवट्यांचा, बाहुल्यांचा, शारीरिक हालचालींचा वापर करतात. तर काही जण पटकथेवर, भूमिकेवर, रूपकतेवर लक्ष देतात. 

या थेरपीमध्ये हळूहळू मनाचा एकएक पदर उलगडला जातो. यातील शेवटची काही सेशन मात्र गंभीर स्वरूपाची होऊ शकतात.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या थेरपीचा कोणाला फायदा होऊ शकतो?
ही थेरपी अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणीही घेऊ शकतं. अर्थात, वयानुसार आणि गरजेनुसार पद्धत नक्कीच बदलू शकते. ही थेरपी घेण्यासाठी अभिनयात तरबेज असण्याचीही गरज नसते. कारण यामधील गोष्टी सगळ्यांसाठीच नवीन असतात व त्याचसाठी थेरपिस्ट तिथे असतो. या थेरपीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माणसाने मोकळे असायला हवे. कोणतेही विचार मनात न आणता, कोण काय म्हणेल, मला जमेल की नाही, याचा विचार न करता माणसाने स्वतःला बिनधास्त झोकून द्यायला हवे.  

याचा फायदा नैराश्य, चिंता, व्यसन, आत्मकेंद्रीतता, तीव्र दुःख, मोठा आजार अशा अनेक गोष्टींसाठी होतो. ही थेरपी केवळ एकट्याने करायची नसून, समान प्रश्न असणाऱ्या लोकांच्या गटात होते. ज्यामुळे एकमेकांचे मानसिक आरोग्य सुधारायला मदत होते. या थेरपीने माणसांमध्ये विविध सकारात्मक बदल होतात तसेच इतरांबरोबर निरोगी नाती निर्माण व्हायलाही मदत होते.  

ड्रामा थेरपिस्ट कोणाला होता येईल?
ड्रामा थेरपिस्ट होण्यासाठी त्या व्यक्तीला मानसशात्रातील बॅचलर किंवा मास्टर्स पदवी असणे गरजेचे असते. त्यानंतर अनेक डिग्री किंवा डिप्लोमा कोर्सेस असतात, जे करून तुम्ही ड्रामा थेरपिस्ट होऊ शकता. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, यासाठी तुम्हाला या दोन्ही विषयांचे ज्ञान व त्यातील आवड असणे अत्यंत गरजेचे व महत्त्वाचे आहे.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Savani Oak Kale on drama therapy