
नाते नवरा-बायकोचे असो, मित्रमैत्रिणींचे असो वा सहज तोंडओळख झालेले असो... नाते जोडणे, टिकवणे, जपणे ही एक अवघड बाब आहे. सर्वांना जमेलच असे नाही. आपण गाडी बराच काळ चालवली, की गाडीला ‘सर्व्हिसिंग’ची गरज पडते आणि आपण गाडी ‘सर्व्हिसिंग’ला देतो.
नाते नवरा-बायकोचे असो, मित्रमैत्रिणींचे असो वा सहज तोंडओळख झालेले असो... नाते जोडणे, टिकवणे, जपणे ही एक अवघड बाब आहे. सर्वांना जमेलच असे नाही. आपण गाडी बराच काळ चालवली, की गाडीला ‘सर्व्हिसिंग’ची गरज पडते आणि आपण गाडी ‘सर्व्हिसिंग’ला देतो.
आपण गाडी नवीन घेतल्यानंतर काही वर्षांनी त्यामध्ये काही बिघाड होतात. कधी ब्रेक, बॅटरी प्रॉब्लेम, तर कधी इंजीन बिघाड होतो. थोडक्यात, गाडीला ‘सर्व्हिसिंग’ची आवश्यकता असते. तसेच नवीन लग्न झालेले जोडपे असो, किंवा जुने नाते असो वेळोवेळी ‘सर्व्हिसिंग’ची गरज ही पडतेच!
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
लग्न झाल्यावर काही वर्षांनी अडचणी, भांडणे, खटके उडणे सुरू होते. ही भांडण सोडवणे, कठीण प्रसंगांमधून मार्ग काढणे, कठीण परिस्थितींना व्यवस्थित हाताळणे, समायोजन करणे महत्त्वाचे असते. यामुळे नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी, विश्वास, आपलेपणा व अनेक चांगल्या गोष्टी होतात, आणि लग्न, नातेसंबंध टिकतात. याच गोष्टींना आपण नात्यांचे ‘सर्व्हिसिंग’ म्हणू, ज्यामुळे नात्यांची गाडी रुळावर येते, हितसंबंध वाढतात.
नवरा-बायकोच्या नात्याबरोबरच इतर नातेसंबंध, ओळखी, मैत्री यांनादेखील ‘सर्व्हिसिंग’ची गरज पडते. काही दुरावलेली नाती असतात, तर काही अबोल नाती असतात अशा नात्यांचा संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो, आणि अचानक अशी नाती आपल्या समोर येतात किंवा आपल्यालाही नाते जोडावेसे वाटते. अशा नात्यांना ‘सर्व्हिसिंग’ची गरज असते. नात्यांचे ‘सर्व्हिसिंग’ म्हणजे हितसंबंध जोडणे, वाढविणे, सुसंवाद साधणे, अबोलाचे रूपांतर बोलण्यात करणे म्हणजेच बोलणे सुरू करणे, वाढविणे. त्यामुळे नात्यांमध्ये प्रेम, आपुलकी, विश्वास, आपलेपणा वाढेल, हे संबंध जोडण्याचे काम ‘सर्व्हिसिंग’ करते.
नात्यांमध्ये दुरावा, अहंकार, द्वेष, मत्सर, स्पर्धा, राग आदी सारख्या अवघड, डोईजड गोष्टी येतात तेव्हा नात्यांच्या इंजिनामध्ये कचरा साचतो. तो कचरा साफ करणे किंवा कचरा काढून टाकायचे काम ‘सर्व्हिसिंग’च्या माध्यमातून करावे. त्यामुळे नात्यांमधील त्रुटी दूर करणे आवश्यक व अनिवार्य आहे. ‘सर्व्हिसिन्ग’मुळे नात्यामधील कमजोरी कळू शकते आणि त्यावर उपाय ही कळू शकतो. त्याचबरोबर त्रुटी बुजवता येतात, प्रेम, आपुलकी, विश्वास, आपलेपणा, वाढवता येतो, माणुसकी जपता येते.
Edited By - Prashant Patil