थॉट ऑफ द वीक : असे करा संकल्प

सुप्रिया पुजारी
Friday, 25 December 2020

आजपर्यंत आपण ‘मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर माहिती घेतली. आज सोशल मीडियावर सर्वत्र त्रास, स्ट्रेस, डिप्रेशन याच विषयांवर बोललं जातं. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही अत्यंत महत्त्वाचं आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात होईल. इतर संकल्पांबरोबरच आपण मानसिक स्वास्थ्यासाठीही संकल्प करणं गरजेचं आहे.

आजपर्यंत आपण ‘मानसिक स्वास्थ्य’ या विषयावर माहिती घेतली. आज सोशल मीडियावर सर्वत्र त्रास, स्ट्रेस, डिप्रेशन याच विषयांवर बोललं जातं. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही अत्यंत महत्त्वाचं आहे. आता नवीन वर्षाची सुरुवात होईल. इतर संकल्पांबरोबरच आपण मानसिक स्वास्थ्यासाठीही संकल्प करणं गरजेचं आहे.

आजपर्यंतच्या लेखमालेतून आपल्याला उमजलेले काही विचार नवीन वर्षाच्या संकल्पासाठी उपयोगी पडतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 • लक्षात ठेवा, ‘जाऊ दे’ म्हणून आपल्या भावनांकडे दुर्लक्ष करू नका. आपला अंतर्गत आवाज ऐका, 
 • तोच आवाज आपल्याला मदत करेल .
 • तुम्ही तुमच्याप्रमाणे ‘क्वालिटी टाइम’ची व्याख्या बनवा व ती आयुष्यात लागू करा. एका परफेक्ट वेळेची वाट पाहू नका. मिळालेल्या वेळेचा 
 • आनंद घ्या.
 • आपले ‘ट्रिगर’ आपल्यापुरते मर्यादित असतात; परंतु ते वेळीच सोडवले नाहीत, तर त्यांचा आपल्या कुटुंबीयांवर व खास करून आपल्यावर परिणाम होतो. वेळीच त्यावर मार्ग काढा.
 • पूर्णपणे भूतकाळ स्वीकारून, त्यातून जे शिकायला मिळाले ते आत्मसात करून मानसिकरित्या विकास होणे म्हणजेच वर्तमान काळात जगणे!
 • आपल्या भावनांना प्रथम स्थान देण्याची कला शिका, ‘नाही’ म्हणायचे असताना ‘मी हो का म्हणाले’पेक्षा ‘मी नाही म्हणाले’ याचा अनुभव घ्या!
 • चूक की बरोबर याचा प्रमाणापेक्षा जास्त विचार न करता त्याची जबाबदारी घ्या आणि आत्मविश्वासाने आपल्या विचारांना व निर्णयांना कृतीमध्ये आणा.
 • ‘स्वार्थी असणे’ ही आपली महत्त्वाकांक्षा नाही, तर आपल्या मानसिक स्वातंत्र्यासाठी लागणारे एक साधन आहे- जे आपल्याबरोबरच इतरांनाही ध्येयप्राप्तीचे बळ देते!
 • कायम दुसऱ्यांकडून तुम्हाला महत्त्व मिळावे ही अपेक्षा न करता, स्वतःच स्वतःला महत्व देणे शिका.
 • कौतुकाची अपेक्षा ठेवण्यात काहीच चूक नाही. सतत कौतुकाची अपेक्षा करणे हानिकारक आहे. जेव्हा आपल्याला अपेक्षित कौतुक मिळत नाही, तेव्हा त्याचा आपल्यावर कसा प्रभाव पडतो व त्यावर मार्ग कसा काढावा हे समजून घेण्यातच तुमचा विजय आहे.
 • जिथे आहोत तिथून पुढे जाणे म्हणजेच प्रगती आहे. मग ती अगदी सूक्ष्म असली तरी चालेल. मागे पाहून जेव्हा स्वतःचा अभिमान वाटतो, त्यालाही ‘प्रगती’ म्हणतात हे लक्षात असू द्या.
 • जेव्हा तुम्ही स्वतःवर व स्वतःच्या विचारांवर शंका घेणे थांबवाल, तेव्हाच तुम्ही भावनिक गुलामगीरीतून मुक्त व्हाल!
 • तुम्हाला ज्या गोष्टीचा जास्त त्रास होतो, त्या तुम्ही आजपासून सहन करणार नाही हे ठरवा. सहनशीलता कुठे व किती ठेवायची याचा हक्क व निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे.
 • जग आपल्याला काय दाखवते व आपण काय पाहतो यातील फरक म्हणजेच ‘दृष्टिकोन’!आपला दृष्टिकोन घडणाऱ्या गोष्टींना अर्थ लावतो. आपली मानसिक स्थिती आपला दृष्टिकोन व त्याला आपण दिलेला अर्थ ठरवितात.
 • आपले मत एक-दोन घटनांमुळे बनलेले असते; पण त्याचा परिणाम मात्र आपल्या संपूर्ण आयुष्यावर पडतो. आपण जे स्वमत बनवतो त्यालाच ‘पूर्वग्रह’ असे म्हणतात. याचा परिणाम पालकत्व, निर्णयक्षमता, नाती व दृष्टिकोनावर पडतो.
 • अपयशाची भीती येणे स्वाभाविक आहे; पण एकदा या भीतीचा उगम समजला, की त्याला सामोरे जाऊन त्यावर मात करणे सोपे होते.
 • स्वपरिवर्तनासाठी सकारात्मक व पूर्वग्रहमुक्त आत्मसंवाद महत्त्वाचा आहे. तुमचा आत्मसंवादच तुमच्या आयुष्याची गुणवत्ता ठरवितो.
 • या मुद्द्यांची वेळोवेळी उजळणी करा व एक आनंदी, स्वच्छंद आयुष्य जगा! नवीन वर्षाची सुरुवात नवीन दृष्टिकोन ठेवून करा!

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Article Write Supriya Pujari on Thought of the week