

Radcliffe Line Partition History
esakal
‘भू-राजकारण’ हा शब्द आणि विषय त्यातील वरवरच्या रुक्षतेमुळे बाजूला सारला जातो. पण हा विषय कळण्यासाठी त्याचा वेगळा काही अभ्यास असण्याची गरज नाही. एखाद्या उत्तम रहस्यकथेत घडणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टींचा परस्परसंबंध आपल्याला कथेच्या शेवटी लक्षात येतो, तसे भू-राजकारणाचे एकेक तुकडे जोडून जगाचं चित्र उभं राहतं. रहस्यकथेचीच थरारकता असलेल्या या विषयाचा एकेक पदर इतिहास आणि भूगोलाच्या वळणांनी उलगडला जातो. मग लक्षात येतं, की हा विषय कधी रुक्ष नव्हताच! ‘वळणं इतिहास-भूगोलाची’ ही खास लेखमाला