Beyond the Hype AI : एआयच्या युगात भारताची भूमिका दुय्यम राहणार? नवोन्मेष आणि संशोधनाची गरज सांगणारे पुस्तक चर्चेत

India AI Innovation and Research : एआयच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर भारताने सेवाकेंद्री अर्थव्यवस्थेपलीकडे जाऊन संशोधन , नवोन्मेष आणि तंत्रज्ञानावर भर देणे का आवश्यक आहे, याचा पुस्तकातून सखोल वेध घेतला आहे.
Beyond the Hype AI

Beyond the Hype AI

esakal

Updated on

रीना झा - saptarang@esakal.com

कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) चर्चा आता केवळ तंत्रज्ञानाच्या जगापुरती मर्यादित राहिलेली नाही; मानवी जीवनापासून अर्थव्यवस्थेपर्यंत आणि युद्धापासून भविष्याच्या राजकारणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात तिचे पडसाद उमटू लागले आहेत. त्यामुळेच या तंत्रज्ञानाचा सांगोपांग विचार करण्यासाठी संदीप वासलेकर यांचे ‘बीयाँड द हाइप : मेनी रिअलिटीज ऑफ एआय’ हे पुस्तक उपयुक्त ठरते. त्याचा मराठी अनुवाद मधुबन पिंगळे व ‘टीम सप्तरंग’ने ‘कृत्रिम बुद्धिमत्ताः आभासाकडून वास्तवाकडे’ या शीर्षकाखाली केला आहे.

‘एआय’च्या उदयातील आव्हाने, संघर्ष आणि शक्यतांचा सखोल अभ्यास करून हे पुस्तक लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर भारताच्या सध्याच्या सेवाकेंद्री संस्कृतीने आता नवोन्मेष आणि संशोधनाकडे वळणे अपरिहार्य आहे, हा महत्त्वाचा संदेशही या पुस्तकातून देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com