Struggles of Indian Fine Artists : ब्रश धुण्यापासून सुरू झालेला प्रवास; चित्रकार किशोर शिंदे यांच्या जीवनाचा वेडावाकडा पण तितकाच प्रेरणादायी रस्ता

Kishor Shinde Artist Journey : दीर्घकाळ कलेपासून दूर राहूनही किशोर शिंदे यांच्यातील चित्रकार कधीच संपला नाही. प्रतिकूल परिस्थिती, कौटुंबिक संघर्ष आणि साधनांच्या तुटवड्यावर मात करत त्यांनी अनपेक्षित वळणांनी समृद्ध झालेला आपला अनोखा सर्जनप्रवास अत्यंत जिद्दीने जिवंत ठेवला.
Kishor Shinde Artist Journey

Kishor Shinde Artist Journey

esakal

Updated on

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

पूर्ण वेळ चित्रकार या भूमिकेपासून दीर्घ काळ दूर राहूनही किशोर शिंदे यांच्यातला कलाकार अस्तंगत पावला नाही. त्यांच्यात परिवर्तन झाले. परतले ते मात्र निव्वळ चित्रकार म्हणून नव्हे तर त्यांचा जीवनानुभव, घेतलेले कष्ट, सातत्य हे सारे घेऊनच. ‘काय होणार याची मला बिलकूल कल्पना नव्हती. मी फक्त काम करत राहिलो.’ कदाचित मध्ये पोकळी निर्माण झाली तरी त्यांनी दाखवलेले सातत्य हे त्यांच्या कामाचे खरे स्वरूप आहे. एक विशेष म्हणजे कलासाहित्याचा तुटवडा हे त्यांच्या कामाला आकार देत राहिले आहे.

काही सर्जनप्रवास हे थेट सरळ रेषेत जात नाहीत. हा रस्ता वेडीवाकडी वळणे घेतो... मधूनच गायब होतो आणि नंतर अनपेक्षितपणे पुन्हा प्रकट होतो. तो मात्र चुकून गवसल्यासारखा नव्हे तर स्पष्ट दिसू लागतो. किशोर शिंदे यांच्याशी बोलताना लक्षात येते की, त्यांची कहाणी या प्रकारचीच आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com