Sunil Gawde Artist Biography : "जे मला डोळे मिटल्यावर दिसतं, तेच मी चितारतो!" आंतरराष्ट्रीय कलाकार सुनील गावडे यांच्या यशाचे 'हे' आहे गुपित.

Contemporary Indian Art : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलाकार सुनील गावडे यांचा कलाप्रवास शालेय उत्तेजनापासून ते जेजे स्कूल ऑफ आर्टपर्यंत विलोभनीय राहिला आहे. 'कला कधी मला सोडून गेलीच नाही' ही त्यांची भावना त्यांच्या अमूर्त आणि चिंतनशील शैलीचे खरे मर्म आहे.
Sunil Gawde Artist Biography

Sunil Gawde Artist Biography

esakal

Updated on

हर्ष भटकळ - saptrang@esakal.com

‘मला जे डोळे मिटल्यावर दिसतं, ते इतरांना उघड्या डोळ्यांनी पाहता यावं असा माझा प्रयत्न असतो.’ कलाकार सुनील गावडे यांचे हे विधान म्हटलं तर सरळसोट आहे, पण त्यात त्यांच्या शाळकरी दिवसापासून ते आंतरराष्ट्रीय कौतुकापर्यंत, अमूर्त शैलीपासून ते तत्त्वचिंतनापर्यंत आणि विनोदापासून अंतर्मुखतेपर्यंतच्या संपूर्ण कलाप्रवासाचे मर्म आहे.

सुनील गावडे यांच्यासारख्या कलाकाराशी बोलताना चुकल्याचुकल्यासारखे वाटते. सुनील साधेपणाने बोलतात म्हणून फक्त नव्हे तर ते आतूनही तसेच आहेत यासाठी. आपण फक्त त्यांच्या विचारातील स्पष्टता अनुभवतो. त्यामागे काही निष्ठा आहेत. ‘मी काही कलाकार व्हायचं ठरवलं नाही.’ एकदा ते सहज उद्‍गारतात. ‘कला कधी मला सोडून गेलीच नाही, ती इथेच होती.’ आणि त्यांचा कलाप्रवास समजून घ्यायचा असेल तर ती साधी गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे.

सुरुवात ठाम

आपण अनेक वेळा कलाकाराची सुरुवात ही नाट्यमय पद्धतीने झाली- त्याची बंडखोरी, अप्रतिम प्रतिभा, त्याच्यातील अद्वितीयतेची झालेली जाणीव असे काही कल्पनेने निर्माण करतो. पण गावडे यांची कथा काहीशी वेगळी आहे. इतर अनेक चित्रकारांप्रमाणे गावडे हेही शाळेत सुरेख चित्रे काढणारे एक विद्यार्थी होते. पण त्यांच्या बाबतीत शाळेने या मुलातील कौशल्य ओळखले. सरस्वती विद्यामंदिर या लहानशा मध्यम सुविधा असलेल्या शाळेत त्यांच्या कलेला उत्तेजन मिळाले. त्यांना ड्रॉइंगच्या वर्गात यायची मोकळीक मिळाली. त्यांची चित्रे सतत शाळेच्या फलकावर प्रदर्शित केली जाऊ लागली. त्यानंतर मात्र अपेक्षेनुसार अडथळा निर्माण झाला. वडिलांना सुनीलच्या अभ्यासाची काळजी वाटत होती. त्यांनी साहित्य विकत घ्यायला पैसे देणे नाकारले. त्यानंतर जे घडले ते मात्र अनपेक्षित होते.

शाळेकडूनच प्रोत्साहन

‘‘त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं, ‘त्याला अडवू नका, आम्ही त्याला रंग विकत घेऊन देतो.’’ तसं पहिलं तर हा साधा प्रसंग, पण ज्या देशात आजही कलाशिक्षण हे मार्गावरील अडथळा निर्माण करणारे धोंड समजली जाते, तिथे याला विशेष महत्त्व होते. त्यानंतर त्यांचा आवाका वाढत गेला. स्पर्धेतला सहभाग, भेटीगाठी, पुरस्कार इत्यादी. फक्त बक्षिसे मिळवण्याला महत्त्व नव्हते. पण तुम्ही इतरांतही उजळून दिसता याची जाणीव होणे याला खोलवर महत्त्व होते. ‘आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो, वेळोवेळी ते जाणवत नाही, पण तो झिरपत राहतो.’

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com