अफगाणिस्तान : गुंतागुंतीचा देश

तालिबान एक मूलतत्त्ववादी इस्लामी गट आहे. त्याचा पराभव अमेरिका आणि नाटो संरक्षक दलांनी दोन दशकांपूर्वी एकत्रितरित्या केला होतं मात्र आज त्या गटांनी स्वतःचं पुनरूज्जीवन केलेलं आहे.
Afghanistan
AfghanistanSakal

तालिबान एक मूलतत्त्ववादी इस्लामी गट आहे. त्याचा पराभव अमेरिका आणि नाटो संरक्षक दलांनी दोन दशकांपूर्वी एकत्रितरित्या केला होतं मात्र आज त्या गटांनी स्वतःचं पुनरूज्जीवन केलेलं आहे आणि अफगाणिस्तानातील सत्ता पुन्हा एकदा हस्तगत केली आहे. मात्र यावेळी हा गट पूर्वीपेक्षा अधिक घातक झाला आहे, असं दिसतं. तालिबान गटाच्या आक्रमणासमोर अफगाणी सुरक्षा बचाव एखाद्या पत्त्यांच्या बंगल्यासारखा कोसळून पडला आणि अवघ्या काही महिन्यांच्या अवधीतच तालिबानचा गट अफगाणिस्तानची सत्ता हस्तगत करण्यात यशस्वी झाला आहे.

आश्चर्याची बाब ही आहे की अमेरिका आणि नाटोचे सदस्य देश आणि सोबतच रशिया किंवा अन्य जी राष्ट्रे अमेरिकेवरच्या हल्ल्यानंतर तालिबानच्या विरोधात आणि इस्लामी मूलतत्त्ववादाचा विरोधात लढले होते ते, या नव्या सत्ताधाऱ्यांच्या म्हणजेच तालिबानच्यासोबत समझोता घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहेत. वैश्विक पातळीवरील सत्ता संघर्ष सतत चालू असतो. मात्र या सत्ता संघर्षाबाबत अनभिज्ञ असलेल्या लोकांसाठी ही बाब संभ्रमात टाकणारी असू शकते. या सत्तासंघर्षमध्ये सर्व संबंधित देश त्यांचे स्वतःचे हितसंबंध जोपासण्यात गुंतलेले असतात त्यामुळे नैतिकतेच्या पाठबळावर लढण्याऐवजी खरी सत्ता प्राप्त करण्यास हे देश प्राधान्य देतात.

'तालिबान'' म्हणजे नेमका काय प्रकार आहे ते खरे समजून घेण्यासाठी अफगाणिस्तानातील भू- राजनैतिक प्रश्न आधी समजून घेणे आवश्यक ठरते त्यानंतरच तालिबानच खरं स्वरूप काय आहे ते आपल्याला उमजेल मात्र त्यासाठी आपल्याला प्रथमपासून सुरुवात करावी लागेल.

अफगाणिस्तान हा एक जटील स्वरूपाचा देश आहे आणि अफगाण प्रांतांमध्ये ज्या घटना घडल्या त्यामुळे अफगाणिस्तानचे शेजारी देश हा त्याहूनही अधिक जटिल स्वरूपाचा विषय आहे. आधुनिक अफगाणिस्तानच्या जडणघडणीमध्ये या जटिल बाबी दडलेल्या आहेत त्यामध्ये तालिबानच्या उगमाचं रहस्य लपलेलं आहे. आधुनिक अफगाणिस्तान हा चहूकडून भूभागाने व्यापलेला असा देश आहे याचं क्षेत्रफळ साधारणपणे २ लाख ४५ हजार चौरस मैल एवढं आहे. प्रचंड मोठ्या अशा हिंदुकुश पर्वत रांगांमुळे या देशाची उत्तर-दक्षिण अशी भौगोलिक विभागणी झालेली आहे. १९९० च्या दशकात तालिबान्यांनी ‘स्वच्छता अभियान’ हाती घेतलं होतं त्यामुळे पुष्कळ जण शेजारील पाकिस्तानमध्ये व जगाच्या अन्य भागांमध्ये स्थलांतरित झाले - भलेही पाकिस्तानात ते कायमच छळणुकीला व दडपशाहीला तोंड देत आलेले आहेत. दूरवरच्या ईशान्येकडील कोपऱ्यामध्ये पामीरच्या पर्वत रांगा - ज्यांना मार्को पोलोनं ''जगाचं छत'' संबोधलं होतं - त्याच्या सीमा ताजिकिस्तान चीन व पाकिस्तान यांच्याशी भिडलेल्या आहेत. पामीरचे पठार हे दुर्गम असल्यामुळे या उंच ठिकाणावरील बर्फाच्छादित खोऱ्यांमध्ये जे वैविध्यपूर्ण आणि वांशिक गट आहेत त्यांच्यामध्ये संवाद अभावानेच असल्याचे आढळून येते.

अफगाणिस्थान या देशावर पूर्वी हिंदू संस्कृतीचा प्रभाव होता त्याखेरीज पारशी साम्राज्य आणि भटक्या तुर्की साम्राज्याचा प्रभावही या देशाने अनुभवला आहे. अगदी अलीकडील म्हणजे ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून कित्येक आक्रमक व विजेत्यानी अफगाणिस्थान हा देश पिंजुन काढलेला आहे. ख्रिस्तपूर्व ३२९ मध्ये मॅसेडोनियाच्या ग्रीकांनी अलेक्झांडर च्या नेतृत्वाखाली मध्य आशिया आणि अफगाणिस्तान विजय संपादन केला होता मात्र त्या पूर्वी भारतावर आक्रमण केलं होतं मात्र इथं त्यांचा सामना त्यांच्याशी असलेल्या भारतीयांशी झाला आणि तिथून त्यांना माघार घ्यावी लागली. अफगाणिस्तानावर ग्रीकांनी हे जे आक्रमण केलं होतं त्यामुळे अशा संमिश्र संस्कृती मध्ये त्याची परिणती झाली.

ख्रिस्त पश्चात ६५४ पर्यंत अरबांच्या सैन्याने संपूर्ण अफगाणिस्तान पालथा घातला आणि या भागातील रहिवाशांचे बळजबरीने धर्मांतर केलं. ख्रिस्त पश्चात ८७४ ते ९९९ या कालावधीदरम्यान अफगाणिस्थान देश पारशी -सॅमिनिड साम्राज्याच्या अंमलाखाली होता. ९७७ त्या १८६ या कालावधीत या भागावर गझनीवाद (गझनीच्या) साम्राज्याचा अंमल होता. या साम्राज्याने भारत, पंजाब आणि पूर्व इराणच्या कित्येक भागांची लूट केलेली होती.

इसवी सन १२१९ मध्ये चेंगीझ खानाच्या नेतृत्वाखाली मंगोल वंशियानी अफगाणिस्तानचा ताबा घेतला त्यांनी सुस्थापित असलेला हेरात आणि बाल्ख यासारख्या शहरांना उध्वस्त केलं आणि मोगलांच्या सैन्याने हजारो लोकांची हत्या केली, त्यांना जायबंदी केलं तथापि काही मोगलांनी आणि अगदी निर्हेतुकपणे अफगाणिस्तानच्या वांशिक स्वरूपाच्या गटाचं परिवर्तन वैविध्यपूर्ण गटात केलं त्यांनी स्थानिकांशी विवाह केले आणि त्यामधून हजारस नावाच्या एका नवीनच समुदायाला जन्म दिला ज्या समुदायाचा अफाणिस्तानमध्ये आणि सोबतच पाकिस्तानमध्ये इस्लामी मूलतत्त्ववादी गटांकडून छळवाद करण्यात येतो.

त्यानंतर साधारणपणे १६० वर्षानंतर टेमरलेनचा दुसऱ्या उत्तराधिकाऱ्याने १३८१ यावर्षी हेरातचा ताबा मिळविला एकीकडे त्याचा व्यापक स्वरूपाचं तिमरिड साम्राज्य हजारो निष्पाप देह, लुटालूट, दहशती आणि सर्व प्रकारच्या पाशवी कृत्यांच्या आधारावर वसविलं होतं. त्यानं त्याची राजधानी समरकंद ठेवली जी आजच्या या आधुनिक जगातील उझबेकिस्तान मध्ये आहे, मात्र त्याच्या पुत्राने - शाहरुखने ही राजधानी १४०५ यावर्षी हैरातला हलविली.

एक मोठा कालावधी उलटल्यानंतर हैरात ही जगातील सर्वाधिक सुंदर, राहण्यास सुयोग्य, सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न आणि समृद्ध अशा शहरांपैकी एक शहर म्हणून ओळखलं जात आहे. हैरातवर तुर्की व वांशिक गटांचाही प्रभाव आहे आणि या दोघांमधील जो संगम आहे ज्याला एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक संदर्भ आहे. जेव्हा आपण अफगाणिस्तान आणि तालिबान याकडे भले कोणताही दृष्टिकोनातून पाहात असू. पंधराव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच जवळजवळ तीनशे वर्षापर्यंत कित्येक टोळ्यांनी भारतावरही आक्रमण केलं आणि त्यापैकी खूप जणांनी दिल्लीवर राज्य केलं होतं अफगाणिस्थान येथील लोधी घराण्यानं दिल्लीवर १४५१ ते १५२६ या कालावधीत राज्य केलं. तैमुरच्या वंशातील बाबर ज्याने दिल्लीही काबीज केली आणि मुघल साम्राज्याची स्थापना केली ज्याचा अंमल भारतातील काही भागांवर होता आणि त्यानंतर ब्रिटिशांनी भारताला त्यांच्या वसाहतवादी अमलाखाली आणलं.

तथापि सोळाव्या शतकापर्यंत तैमूर प्रणित साम्राज्याची चमक ओसरली होती मात्र या वैविध्यपूर्ण आक्रमणामुळे अफगाणिस्तान या राष्ट्राची निर्मिती खूप बिकट अवस्थेतून झाली. या राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कित्येक जटिल स्वरूपाचे वांशिक गट, सांस्कृतिक व धार्मिक पैलू अशा सर्व बाबींची सरमिसळ घडून आली, त्यामुळे अफगाणिस्तान या देशाची निर्मिती प्रक्रिया खूपच जटिल झाली. पश्चिम अफगानिस्तानवर पारशी वा दारी यांचा वरचष्मा आहे. दारी ही स्थानिक (बोली) भाषा केंद्रीय अफगाणिस्तानमधील हझारस जमातीचे लोकही बोलतात ज्यांचं शियांमध्ये धर्मपरिवर्तन केलं होत. जेणेकरून अन्यथा सुन्नी भागात असलेल्या हा सर्वाधिक मोठा शिया गट बनला. पश्चिमेकडे प्राचीन संस्कृतीचे पुनरुज्जीवन करणारे ताजिक हे लोकही दारी बोलीभाषा बोलतात. उत्तरेकडील अफगाणिस्तानमध्ये उज्बेक, तूर्किमान, किरगिझ आणि अन्य लोक हे केंद्रीय आशियायी तुर्की भाषा बोलतात आणि आग्नेयेकडे पश्तून टोळ्या त्यांची स्वतःची (बोली) भाषा बोलतात जी भारतीय आणि पारशी या भाषांचे एक मिश्रण आहे.

(सदराचे लेखक दिल्लीतील ‘विचार विनिमय केंद्रा’चे संशोधन संचालक आहेत)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com