Theatre Meaning Beyond Message : नाट्याचा खरा अर्थ: आरशाऐवजी रूपकातून उघडणारी मनाच्या जगाची खिडकी

How Metaphor and Form Reveal Inner Worlds : चं. प्र. देशपांडे, मकरंद साठे यांसारख्या नाटककारांच्या रूपकप्रधान मांडणीतून आणि वेगळ्या फॉर्ममधून नाटक सामाजिक विधानांच्या चौकटी मोडत ‘हाना’सारखे फुलत राहते व प्रेक्षकाला हलवणारा, विचलित करणारा नाट्यानुभव घडवते
Beyond Reflection: Why Drama is a Window to the Inner Human World

Beyond Reflection: Why Drama is a Window to the Inner Human World

Sakal

Updated on

आशुतोष पोतदार, potdar.ashutosh@gmail.com

नाटकाविषयी बोलताना म्हटलं जातं की नाटक म्हणजे समाजाचा आरसा असतो; पण आरसा तर फक्त जे आहे तेच आणि तसेच दाखवतो. नाटककार त्याचे नाटक मात्र जे आहे तेच नाही, तर जे असू शकते, जे असायला हवे होते, जे आतून सतत बोचत राहते तेही मांडत असतो. म्हणजे नाटक हे आरशापेक्षा खिडकीसारखे असते, असे म्हणता येईल. नाटक बाहेरच्या जगाची आणि माणसाच्या आतल्या मनोविश्वाची खिडकी उघडतं.

अनेकांना वाटते की नाटकानं समाजाला काहीतरी शिकवलं पाहिजे किंवा नाटकातून एखादा संदेश लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. संदेश देणं महत्त्वाचंही असतं; पण दरवेळी नाटकाचा ‘उपयोग’ काहीतरी शिकविण्यासाठी किंवा समाज सुधारण्यासाठी नाटक करणं म्हणजे अभिव्यक्तीला बांधून ठेवण्यासारखं होईल. नाटकातील नाट्याकडे दुर्लक्ष करून ते फक्त संदेश देण्यासाठी लिहिलं तर ते नाटक राहणार नाही, व्याख्यान होईल; शाळेतला धडा बनेल. आणि धडा शिकवणारं नाटक प्रेक्षक एकदा पाहतात, टाळ्या वाजवतात आणि ते विसरूनही जातात. कारण ते त्याला आतून हलवत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com