

Meena Kumari biography
esakal
अभिनयसम्राज्ञी, ‘ट्रॅजिडी क्वीन’ अशा विविध बिरुदावल्यांनी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री मीनाकुमारीविषयी विविध स्वरूपाचे लेखन आतापर्यंत प्रसिद्ध झाले आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके, दिवाळी अंक, पुस्तके यांमधून प्रसिद्ध झालेल्या लेखनानंतर आता ज्येष्ठ चित्रकार आणि लेखक श्रीकांत धोंगडे यांनी ‘अतृप्ता’ या नावाने मीनाकुमारीचे शोधचित्र लिहिले आणि रेखाटले आहे. तिच्या आयुष्यातील घटनांचा शोध घेतानाच सोबत मीनाकुमारीची रेखाटलेली चित्रे, दुर्मीळ छायाचित्रे यांचा समावेश असलेला ४०० पृष्ठांचा हा ग्रंथ म्हणे मीनाकुमारीच्या आयुष्याचा सविस्तर जीवनपटच आहे.