Ashes 2026 Australia Vs England : कांगारूंसमोर बॅझबॉलचा बँडबाजा! ऑस्ट्रेलियाने ४-१ ने ॲशेस चषक राखला; इंग्लंडच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह

Test Cricket Popularity and Bazball : इंग्लंडच्या आक्रमक 'बॅझबॉल' तंत्राला धूळ चारत ऑस्ट्रेलियाने ॲशेस मालिकेत ४-१ असा दणदणीत विजय मिळवला, ज्यातून कसोटी क्रिकेटमधील लोकप्रियता आणि आक्रमकता यांमधील संतुलनाचा नवा पैलू समोर आला.
Ashes 2026 Australia Vs England

Ashes 2026 Australia Vs England

esakal

Updated on

शैलेश नागवेकर

कसोटी क्रिकेटबाबत सर्वंकष निष्कर्ष काढायचा म्हटला तर प्रत्येकाला टी-२० रूपातच लाल चेंडूवरील क्रिकेट खेळायचे आहे. त्याचा सकारात्मक परिणाम कसोटी क्रिकेटची लोकप्रियता वाढण्यावर होत आहे. ॲशेस मालिकेतील प्रत्येक सामना प्रत्येक दिवस जवळपास हाउसफुल होता, हे सुचिन्हच आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये शंभराहून अधिक वर्षांचा इतिहास असलेली यंदाची ॲशेस मालिका संपली आणि ऑस्ट्रेलियाने अपेक्षेप्रमाणे निर्विवाद वर्चस्व मिळवले. विशेष म्हणजे, प्रमुख कर्णधार आणि त्यापेक्षाही महत्त्वाचे म्हणजे भेदक गोलंदाज पॅट कमिन्स केवळ एकच कसोटी खेळला; तर दुसरा मॅचविनर वेगवान गोलंदाज जॉश हेझलवूड तर एकही सामना खेळू शकला नाही. तरीही ऑस्ट्रेलियाने ४-१ अशी दणदणीत विजयश्री साकारली. त्याहून महत्त्वाचे म्हणजे त्यांनी पुन्हा एकदा बॅझबॉल मानसिकेचा बँडबाजा वाजवला. हे बॅझबॉल म्हणजे नक्की काय तर न्यूझीलंडचे माजी आक्रमक फलंदाज ब्रँडन मॅकलम इंग्लंडचे प्रशिक्षक झाले आणि त्यांनी कसोटीतही आक्रमक फलंदाजी करण्याची मानसिकता निर्माण केली. मॅकलम आणि बेन स्टोक्स या प्रशिक्षक-कर्णधाराच्या जोडीने कसोटी क्रिकेटचा पवित्रा बलण्याचा प्रयत्न केला; पण कोणत्याही प्रयोगाचे यशाअपयश शेवटी निकालावर मोजले जाते. सुरुवातीच्या काळात भले काही वेळा अपवाद केला जाऊ शकतो; पण सरतेशेवटी कोणताही प्रयोग यशाअपयशाच्या तराजूतच मोजला जातो. सिडनीमध्ये गुरुवारी ॲशेस मालिकेतील अखेरचा कसोटी सामना संपला आणि मॅकलम यांनी २०२२मध्ये प्रशिक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बॅझबॉलच्या यशाअपयशाची कुंडली पुढे आली. ती अशी...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com