

Dhyas Vande Mataramcha Book
esakal
भारतीयांची आत्मग्लानी नष्ट करणारे आणि राष्ट्राच्या मानगुटीवरील पारतंत्र्याचे जोखड दूर सारणारे स्वातंत्र्यसूक्त म्हणजे वंदे मातरम्. पारतंत्र्याच्या काळात या गीतातील ओजस्वी शब्दांनी जशी देशभक्तांना आणि क्रांतिकारकांना स्फूर्ती दिली तशीच साहित्यिकांना आणि कलावंतांना भुरळही घातली. या गीतातून मिळणारी स्वातंत्र्याची आणि देशभक्तीची प्रेरणा जशी आजही कायम आहे, त्याचप्रमाणे साहित्यिकांना आणि कलावंतांना या गीताची पडलेली भुरळही अद्याप टिकून आहे. याच प्रेरणेतून मिलिंद सबनीस या अवलियाने आपल्या आयुष्यातील तब्बल तीस वर्षे या गीतासाठी समर्पित केली. या तीन तपांच्या अद्भुत प्रवासाचे रसभरीत वर्णन त्यांनी ध्यास ‘वन्दे मातरम्’चा या पुस्तकातून केले आहे.