Millennials transition Analog to Digital : अनालॉग ते डिजिटल; मिलेनियल्सच्या प्रवासाची कहाणी

Corporate Retreats and Ice-breaking : अॅनालॉग ते डिजिटल अशा संक्रमणाचे साक्षीदार असलेले 'साहित्य अकादमी युवा पुरस्कार' विजेते लेखक प्रणव सखदेव यांनी 'अधलंमधलं' या सदरातून दोन पिढ्यांमधील करड्या छटांचा वेध घेण्यास सुरुवात केली आहे.
Millennials transition Analog to Digital

Millennials transition Analog to Digital

esakal

Updated on

प्रणव सखदेव- sakhadeopranav@gmail.com

‘मिलेनियल्स’नी ‘ॲनालॉग ते डिजिटल’ हा बदल केवळ पाहिला नाही, तर तितक्याच वेगाने त्यांना तो आपल्यात सामावून घ्यावा लागला. या पिढीतला, जग डोळसपणे पाहून शब्दांत उतरवणारा लेखक आहे प्रणव सखदेव. ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या त्यांच्या कादंबरीला २०२१ चा ‘साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार’ मिळाला होता. रोजच्या आयुष्यात दिसलेलं, वाटलेलं, दोन टोकांच्या मधल्या करड्या-राखाडी प्रदेशातील काही, प्रणव मांडणार आहेत ‘अधलंमधलं’ या सदरात.

‘कॉर्पोरेट-भोंडले’ (एका ज्येष्ठ मित्राकडून उचललेला शब्द!) अर्थात कॉर्पोरेट-रीट्रीट्स किंवा मोठमोठ्या कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांच्या संमेलनावेळी ‘आइस-ब्रेकिंग’ व्हावं म्हणून लाइफ कोच, लाइफ ट्रेनर लोक्स वेगवेगळे खेळ घेतात. त्याआधी एक ओळख समारंभ असतो. म्हणजे काय, तर उपस्थित असलेले सगळे जण एकेक करत स्वतःची ओळख करून देतात, स्वतःबद्दल माहिती सांगतात. आपण कोण आहोत, कुठे वाढलो, शिक्षण काय, काय काम करतो, पद काय, आवडीनिवडी काय आहेत, वगैरे सांगितलं जातं. म्हणजे मग एकमेकांना एकमेकांच्या समान आवडीनिवडी समजतात. थोडी जवळीक निर्माण होते आणि पूर्वग्रहांचा, अपरिचयाचा थंडगार बर्फ हळूहळू वितळू लागतो. माणसं जवळ येण्यास मदत होते, बाँडिंग तयार होतं. या सदरातला हा पहिला लेखही आपल्यातलं आइस-ब्रेकिंगच आहे असं समजा...

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com