New Marathi Book : भावविश्व समृद्ध करणारा काव्यप्रवास

Marathi Poetry and Creative Process : मनातील व्यक्त-अव्यक्त भावनांची घुसळण, अनुभवांचे शब्दांत होणारे रूपांतर आणि आनंद-वेदनेतून जन्म घेणारी कविता यांचा सृजनशील प्रवास या कवितासंग्रहातून उलगडतो.
Marathi Poetry and Creative Process

Marathi Poetry and Creative Process

esakal

Updated on

शिरीन कुलकर्णी - saptarang@esakal.com

अव्यक्ताची वादळे’ हा संजीवनी बोकील यांचा कवितासंग्रह हातात पडताक्षणी लक्ष वेधून घेते ते शीर्षक! जोरदार पाऊस, सुसाट वारा, समुद्रात उसळलेल्या लाटा हे दृश्य डोळ्यांसमोर उभे राहते आणि लक्षात येते की, कविता जन्मण्यापूर्वी मनात होणाऱ्या घुसळणीची ही संदर्भखूण आहे.

एखाद्या अज्ञात शक्तीने दिलेले शब्दांचे वरदान आणि त्यातून झालेला कवितेचा जन्म, ही सृजनप्रक्रिया सांगताना कवयित्री लिहिते - ‘अव्यक्ताची वादळे

शिरतील आता

उद्गारांच्या उष्ण रेखांशात....

लागतील काही शोध

पायरवांचे पाऊलवाटेला

येतीलच तहानले उमाळे

शब्दांकाठी शोष भागवायला...!’

मनातलं सगळं दृश्य-अदृश्य शब्दांत प्रवेश करतं आणि कविता शब्दांच्या काठाशी उभी राहते. ही संपूर्ण प्रक्रिया सुंदर आणि अतीव आनंद देणारीच असते.

कवयित्रीची मनोभूमी पदरात पडणाऱ्या शब्दांसाठी अशी सुसज्ज असते, तेव्हाच कवितेचा प्रसव होतो. अर्थात, हे सारे व्यक्त होऊ पाहणारे अनुभव आनंददायकच असतील, असे नाही. कधी त्यात ‘लपलेल्या गुहा किंवा वारुळातले कहर’ही असतात आणि ते कवयित्रीला

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com