marathi book review : ‘मर्ढेकर आणि टीकाकार, भ्रांत कोण?’ सौंदर्यशास्त्राला अभिरौचिकीची नवी चौकट; टीकेची शास्त्रकाट्याने चिकित्सा

Mardhekar’s Contribution to Literary Criticism : बा. सी. मर्ढेकर हे कवी आणि सर्जनशील कलावंत असण्यासोबतच साहित्यसमीक्षकही होते. सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासातून त्यांनी साहित्य, कला आणि सौंदर्यविचारांवर केलेल्या लेखनाचे महत्त्व डॉ. विवेक गोखले यांनी पुस्तकातून मांडले आहे.
marathi book review

marathi book review

esakal

Updated on: 

मराठी वाङ्‍मय इतके परपुष्ट आहे की, ते पुरेसे परपुष्टही नाही!’’, असे गमतीदार विरोधाभासाचे; पण विलक्षण मर्मदृष्टी असलेले वाक्य बा.सी.मर्ढेकर लिहून गेले आहेत. इंग्रजीशिवायही जगातील अनेक भाषांत उत्तमोत्तम साहित्य आहे. त्या दुनियेतून फारशी ‘पुष्टता’ आपण मिळवली नाही, यावर मर्ढेकरांनी बोट ठेवले आहे. हा उल्लेख यासाठी की, मर्ढेकर सर्जनशील कलावंत तर होतेच, पण समीक्षकही होते.

त्यांच्या समीक्षेला सौंदर्यशास्त्राच्या अभ्यासाची जोड होती. सौंदर्य आणि साहित्य, आर्ट््स अँड मॅन हे या संदर्भातील त्यांचे ग्रंथ म्हणजे अशा अभ्यासाचे फलित. खरे तर सौंदर्यशास्त्र ही तत्त्वज्ञानाची एक शाखा. या विषयाचे औपचारिकरीत्या शिक्षण घेऊन त्यावर प्रभुत्व मिळविलेल्या व्यक्ती त्यावर जेवढ्या अधिकारवाणीने लिहू शकतील, तसे इतर लिहू शकणार नाहीत. याचे कारण विशिष्ट परिभाषा, संज्ञा-संकल्पना यांबाबत शिक्षित तत्त्वज्ञाकडे असेल तेवढी स्पष्टता इतरांकडे असणार नाही. पण याचा अर्थ कोणी तसा प्रयत्न करूच नये, असा नाही. उलट सर्जनशील कलावंत जेव्हा या विषयाला स्पर्श करतो, तेव्हा या चर्चेत नक्कीच मोलाची भर पडू शकते. तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक डॉ. विवेक गोखले यांना मर्ढेकरांच्या बाबतीत नेमके हेच जाणवत होते. त्यामुळेच टीकाकारांनी मर्ढेकरांवर याबाबतीत केलेल्या अन्यायाच्या परिमार्जनाचे काम या पुस्तकाद्वारे त्यांंनी केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com