बाबा नावाचा संस्कारवारसा

बाबा नावाचा संस्कारवारसा
SYSTEM
Summary

उत्तुंग मंडळींचा घरातला राबता, त्यांची चर्चा आणि दौऱ्यांत जवळून पाहिलेल्या बाबांच्या कामातून घडत गेलो, संस्कार आणि वारसा मिळत गेला, याचा आनंद वाटतो, असे सांगताहेत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे पुत्र अंबर आढाव.

- अंबर आढाव

सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्रभर दौरे, विविध आंदोलने, सत्याग्रह आणि कष्टकऱ्यांचे नेतृत्व करताना बाबांना घराकडे लक्ष द्यायला वेळ नसायचा. तथापि, उत्तुंग मंडळींचा घरातला राबता, त्यांची चर्चा आणि दौऱ्यांत जवळून पाहिलेल्या बाबांच्या कामातून घडत गेलो, संस्कार आणि वारसा मिळत गेला, याचा आनंद वाटतो, असे सांगताहेत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे पुत्र अंबर आढाव. ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव मंगळवारी (ता.1जून) 91व्या वर्षात पदार्पण करत आहेत.

मी मागील दोन महिन्यात उत्तर अमेरिकातील काही कॉर्पोरेट इवेंटसमध्ये आयटी कॉर्पोरेट नेतृत्वातील पॅनेलचा सदस्य म्हणून भाग घेतला. चर्चेचे विषय होते : Diversity and Inclusion in workplace" आणि दुसरा विषय "Women in Corporate Leadership". या विषयावर बोलताना, इतरांचे ऐकताना नकळत मन लहानपणीच्या आठवणीत धाव घेत होते, पुण्यात नाना पेठेत. जिथे बालपणी या सर्व विषयांचे मनावर-वृत्तीवर टाकीचे घाव पडले, जिथून या मूल्यांची आणि विचारांची पक्की जडणघडण झाली. अमेरिकेतील मिनियापोलिस येथे जॉर्ज फ्लॉईड यांच्या निधनाने संपूर्ण उत्तर अमेरिकेत देशभरात वांशिक आंदोलने, दंगल आणि नागरी अशांतता निर्माण झाली. "ब्लॅक लाईव्हज मॅटर' चळवळीने पुन्हा जोर धरला. त्यात अनेक अग्रगण्य कंपन्यांबरोबर ज्या बहुराष्ट्रीय कंपनीत मी काम करतो अशांनी वंशभेद, पूर्वग्रह आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध ठाम भूमिका घेतल्या. आम्ही कंपनीत ठोस पावले उचलली. कर्मचाऱ्यांमध्ये जागृतीसाठी ताबडतोब चर्चासत्रे, ट्रेनिंग घेतले.कित्येक कर्मचाऱ्यांचा, सहकाऱ्यांचा दृष्टिकोन संकुचित, पूर्वग्रहदूषित आहे. दुसरीकडे माझ्या मनात अभिमान आणि आनंद आहे की, हे मला शिकायची गरज नाही. ही बहुविधता आणि धर्मनिरपेक्षतेच्या मूल्यांचा, सामाजिक बांधिलकीचा वारसा मला बाबांकडून मिळालाय.

बाबा नावाचा संस्कारवारसा
अनाथ व निराधारांचं ‘ माहेर’

संस्काराचा उत्तुंग वारसा

उत्तर अमेरिकेतल्या अग्रगण्य बहुराष्ट्रीय कंपनीत मी आज डायरेक्‍टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्‍नॉलजी म्हणून काम करतो. टोरांटोला राहतो. मला नमूद करावेसे वाटते की, माझ्या कॉपरिट जगातील प्रगतीमध्ये या मूल्यांचा मोठा वाटा आहे. मी नास्तिक आहे. तथापि, महात्मा फुल्यांच्या भाषेत म्हणायचे तर त्या निर्मिकाचे शतशः आभार. मी बाबांच्या घरी जन्माला आलो. बाबांमुळे, त्यांच्या कार्यामुळे गुणीजनांचा परिसस्पर्श लाभला. नाना पेठेतील तीन खोल्यांच्या भाड्याच्या घरात आचार विचारांचे फार संपन्न आणि समृद्ध आयुष्य जगलो. ती जडणघडण, तो वारसा घेऊन जगताना फार समाधानी वाटते. तत्वनिष्ठ, गुणांनी, विचारांनी, कार्याने अतिशय उंची गाठलेल्या बाबांच्या मित्र, सहकारी, गुरुजनांच्या मैफिली ऐकण्याची आणि त्यातून शिकण्याची सुवर्णसंधी लहानपणी मिळाली.

लहानपणी आम्हाला वडील म्हणून बाबा तसे कमी वाट्याला आले. ते सातत्याने वेगवेगळ्या चळवळी, आंदोलने, दौरे आणि सत्याग्रहात व्यग्र असत. उरलेल्यावेळी जेलचे दौरेही चालू. त्यांची झोकून देऊन काम करण्याची झुंजार वृत्ती, ते जेव्हा एखाद्या आंदोलनात, सत्याग्रहात आकंठ बुडालेले असत आम्हाला कधीच शाश्‍वती नसे की ते घरी येणार. सायंकाळी बातमी यायची की, त्यांना अटक झाली. आईने खरं सांगायचे तर त्यावेळी आई आणि वडील अशी दोघांची भूमिका निभावली. अगदी लहानपणीचे बाबा मला आठवतात, ते अनिल काकांनी (अवचट) घेतलेल्या ब्लॅक अँड व्हाइट फोटोमधून आणि सायंकाळी अनिता काकी नाना पेठेतला दवाखाना चालवत असत आणि त्याच्या मागच्या खोलीत बाबा आणि अनिलकाका बसलेले. बाबांचे विविध लेखांचे, पुस्तकांचे लिखाण चालू असे किंवा रोजच्या घडामोडींचे प्रेस रिलीज स्वतः लिहून ते वर्तमानपत्रांना पाठवत. त्याचवेळी अनिलकाकासमोर बसून ओरिगामी, कधी वाचन. लिखाण. बाबांकडे कार्यकर्त्यांची सारखी वर्दळ असे. विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्वे, राजकीय नेते बाबांना भेटायला येत. त्यावेळी स्वयंपाक करत आमचा अभ्यास घेण्याची आईची तारांबळ चालू असे.

बाबा नावाचा संस्कारवारसा
कुठं सात कोटी, कुठं ५० लाख!

घरकामात बाबांची मदत

बाबाही जेव्हा जमेल तेव्हा आईला घरकामात मदत करत. भाजी निवड, चपत्या भाज, कधी स्वतः भाजी बनवत. छान थापून मस्त ज्वारीच्या भाकरी बनवत. माझे लग्न झाल्यावरही माझी बायको अजिताला ते भाकरी करायला मदत करत, तेव्हा ती इंजिनियरींग कॉलेजमध्ये शिकवीत असे. ते दृश्‍य अजूनही डोळ्यासमोर ताजे आहे. माझे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पुण्यातील "नूमवी'त झाले. शाळेत आणि घरी विचारांचा आचारांचा, चांगलाच

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com