Bara Shigri Glacier : बडा शिग्री हिमनदी; हिमालयातील शांततेचा प्रवास

Bara Shigri Glacier : बडा शिग्री हिमनदी, भारतातील हिमाचल प्रदेशमधील सर्वात मोठ्या हिमनद्यांपैकी एक, लांबी सुमारे 27.7 किमी आणि क्षेत्रफळ 126 km² आहे; ही चंद्रा नदीला जीवन देणारी महत्त्वाची धारा असून तिचे वितळण आणि हालचाल हवामान बदलामुळे बदलत आहे.
Bara Shigri Glacier

Bara Shigri Glacier

sakal

Updated on

उमेश झिरपे - umzirpe@gmail.com

पहाट अजून पूर्ण उजाडली नव्हती. लाहौल स्पीतीच्या त्या उंच दरीत तंबूच्या बाहेर पडलो तेव्हा हवा कडाक्याची थंड होती, पण आकाश स्वच्छ निळं होतं. समोर दूरवर काळसर करड्या मोराइनच्या पट्ट्यांमधून एक विस्तीर्ण पांढरा पट्टा दिसत होता. ती होती बडा शिग्री हिमनदी. पहिल्या नजरेत ती एखाद्या गोठलेल्या समुद्रासारखी वाटली. गंगोत्रीसारखी धार्मिक वर्दळ नव्हती, खुम्बूसारखा गोंधळ नव्हता. इथे शांतता होती. रांगडी, खोल आणि अभ्यासक शांतता.

मोराइनवरून पुढे जाताना पायाखाली सैल दगड खळखळत होते. एखादा दगड सरकला की खाली बर्फाची झलक दिसे आणि त्याखालून पाण्याचा मंद आवाज ऐकू येई. त्या आवाजात घाई नव्हती, पण थांबणंही नव्हतं. तेव्हा जाणवलं की हिमनदी म्हणजे स्थिर वस्तू नाही. ती संथ हालचालीत असलेली, श्वास घेणारी प्रणाली आहे. आपण तिच्यावर चालतो, पण तीही आपल्या वेगाने पुढे सरकत असते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com