
प्रा. अविनाश कोल्हे
nashkohl@gmail.com
उत्पल दत्त म्हणजे बंगाली रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टीतील एक आदरणीय नाव. त्यांच्या ‘बॅरीकेड’ नाटकाला १९६९ साली बंगालमधील नक्षलबारी गावात उसळलेल्या राजकीय बंडाचा संदर्भ आहे. दत्त यांनी ते नाटक लिहिताना हिटलरला डोळ्यासमोर ठेवलं. हिटलरचा सत्तेच्या सर्वोच्च स्थानापर्यंत झालेला प्रवास त्यात पाहायला मिळतो.