
विनोद राऊत rautvin@gmail.com
दिग्दर्शक बासू चॅटर्जी यांच्या ‘छोटी सी बात’ चित्रपटाने नुकतेच ५०व्या वर्षांत पदार्पण केले. एका इंग्रजी सिनेमावरून बनलेला ‘छोटी सी बात’ चित्रपट आधी निर्मात्याकडून नाकारला गेला; पण बासूंजींनी त्यात कोणताही बदल केला नाही. हलकीफुलकी कॉमेडी असलेल्या अमोल पालेकर यांच्या सिनेमात प्रेक्षकांना ‘आपली बात’ दिसली आणि म्हणूनच त्याचे गारुड अजून कायम आहे.