Beauty and the Beast Modern Love Story : ब्युटी अँड द बीस्टची आधुनिक प्रेमकथा, सावीच्या लग्नाची गोष्ट

Beauty and the Beast Modern Love Story : ‘ब्युटी अँड द बीस्ट’ या प्रसिद्ध कथेची आधुनिक काळातील मांडणी एका वेगळ्या वळणावर येते. अमेरिकेत एमएस करून चांगली नोकरी मिळवलेल्या सावीच्या लग्नासाठी आई-वडील प्रयत्न करत असून, तिच्या जोडीदाराच्या निवडीभोवती कथा आकार घेते.
Beauty and the Beast Modern Love Story

Beauty and the Beast Modern Love Story

esakal

Updated on: 

सारिका चाटुफळे-कुलकर्णी

ब्युटी अँड द बीस्ट’ अशी मूळ इंग्रजी कथा आहे. एक सुंदर मुलगी एका शापित राक्षसाच्या ताब्यात सापडते आणि त्याच्याबरोबर राहताना तिला लक्षात येते, की हा राक्षस मनाने चांगला आहे. एके दिवशी ती राक्षसावर प्रेमाची कबुली देते आणि राक्षस शापातून मुक्त होऊन राजकुमार होतो. अशी ही मूळ कथा आजच्या काळात जर लिहिली गेली तर कशी असेल.

अमेरिकेतून एमएस केल्यावर सावीला तिकडेच चांगली नोकरी मिळाली होती. तिकडे तीन वर्षे नोकरी केल्यावर सावीने आता लग्न करायला हवे म्हणून तिचे आई-बाबा मागे लागलेले होते. तिने अमेरिकेतीलच कुठला तरी मुलगा पसंत करावा म्हणून परस्पर तिकडची स्थळंदेखील पाठवत होते. भारतीय पालकांचे हे एक असते. त्यांना आपला देश अतिशय वाईट वाटत असतो. मग बाहेरच्या देशात म्हणून मोरोक्कोला देखील पाठवतील मुलांना! सावीने अमेरिकेतच राहावे म्हणून तिच्या आई-बाबांची केवढी तरी धडपड चालू होती. ‘आपरूप’ या खास अमेरिकी भारतीय लग्नासाठीच्या स्थळांच्या ॲपवर त्यांनी सावीचे नाव नोंदवले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com