- श्याम मनोहर, saptrang@esakal.com
व्यक्तीने मृत्यूवर गोष्टी, काव्ये, गाणी केलीत. पुन्हा पुन्हा वरचेवर मृत्यूवर गोष्टी, काव्ये, गाणी निर्माण होत राहतात. खंड नाही कधीच.
जिवंतपणावर गोष्टी, काव्ये, गाणी आहेत?
व्यक्तीला ‘हॉर्ट ॲटॅक’ आला... पळा, धावा, डॉक्टरकडे न्या... वाचला पेशंट! जिवंतपणा! जिवंतपणाचा आनंद...
किती वेळ? किती काळ?
जिवंतपणा साधला. आता व्यक्ती खूप काय करते. जिवंतपणा गृहीत धरते. यश, समृद्धी, वासनापूर्ती ह्याचा व्यक्ती आनंद घेते. व्यक्ती जिवंतपणाचा आनंद घेते? व्यक्तीला जिवंतपणाचा आनंद घेता येत नाही?