
अक्षय शेलार - shelar.abs@gmail.com
पोलिसांच्या कामकाजाविषयीच्या मालिका आणि चित्रपट हे गेली अनेक दशके प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा प्रकार राहिले आहेत. अमेरिकन चित्रपट आणि मालिकांमध्ये ही लोकप्रियता ठळकपणे दिसते. गुन्ह्याची उकल, न्याय मिळवून देणं आणि एका नायकाच्या किंवा एका टीमच्या माध्यमातून पोलिस यंत्रणेतील मूल्यांचा वेध घेणं, इत्यादी घटक यात आढळतात; मात्र गेल्या काही वर्षांत पोलिस यंत्रणा, तिची कार्यपद्धती आणि व्यवस्थेच्या, तसेच पोलिसांच्या वैयक्तिक नैतिकतेबाबत व्यापक समाजात प्रश्न निर्माण झालेले आहेत. अमेरिकेतील ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ आंदोलनानंतर विशेषतः, या माध्यम प्रकारातील परंपरागत रूढींचा पुनर्विचार होऊ लागला आहे. अशा पार्श्वभूमीवर ‘ऑन कॉल’ ही ॲमेझॉन प्राईमवरील नवीन मालिका एक वेगळा, अधिक आत्मपरीक्षणशील दृष्टिकोन घेऊन येते.